आदिवासी विकास मंत्री वूईके यांची पाच तास चर्चा, पण तोडगा निघालाच नाही! आंदोलकांसी पाच तास चर्चा पण तोडगा नाहीच, इतर मागण्यांवर आंदोलक ठाम
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

पुणे : पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विविधि मागण्यांसाठी विद्यार्थी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेच्या मागणीसंदभाृत काल स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असला, तरी इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यातच आज (दि.26) आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
मंत्री अशोक वूईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारकडून काही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर इतर मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याने विद्यार्थी आंदोलन मागण्यावर ठाम राहून आंदोलन सुरू आहे.
डॉ. अशोक वूईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर, त्यांनी पत्राकर परिषद घेवून माहिती दिली.मंत्री वूईके म्हणाले की, आमचा आंदोलक विद्यार्थ्यांशी चांगला संवाद झाला . मला आनंद झाला की आमची मुले अतिशय चांगले बोलायला लागले आहेत. त्यांच्यवा संवादाच्या माध्यमातून त्यांनी आम्ही 2-3 दिवसांचा वेळ दिला आहे. काही गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत, त्यावर आम्ही काम करू, आमची मुलं आहेत, आम्ही त्यवांचे आहोत. आमची आणि विद्यार्थ्यांची सविस्तर चर्चाझाली. 14 मुद्यांवर चर्चा झाली आहे. तयंनी दोनप दिवसांची मुदत दिलेली आहे. या काळात ड्राप्ट बनवून द्यायचा आहे.
आंदोलक विद्यार्थी यावेळी म्हणाले की, आमची ज्याबाबत चर्चा झाली त्यातील काही गोष्टी टेक्निकल आहेत. आम्हाला 12 हजार 500 बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहेत. यासाठी आम्ही 2 दिवसांचा कालावधी दिला आहे.तसेच भरती कशी करणार याचे वेळापत्रक आम्हला ड्राप्टच्या मार्फत द्या, हा ड्राप्ट मिळाल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ. सध्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचंही आंदोलक म्हणाले.
गेल्या 14 दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत असून, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मंत्री वूईके यांच्या भेटनंतरही मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच राहणार आहे. यावर सरकार काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागले आहे.



Comments