परवानगी द्या अथवा नका देेऊ, 90 लाख मराठे मुंबईत घुसणारचं! - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

आंतरवाली: जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारच्या गृह विभागाने आझाद मैदान वगळता इतरत्र आंदोलनास बंदीसह आझाद मैदानात केवळ एक दिवस सकाळी 9:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत आंदोलन करता येईल, तसेच शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवसी आंदोलनास परवानगी नसल्याचे आदेश जारी केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे जरांगे पाटील आक्रम झाले असून मुंबईत आंदोलनाची परवानगी द्या, अथवा नका देऊ, 90 लाख मराठे मुंबईत घुसणारच असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
सरकाच्या मुंबईतील आंदोलनाच्या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आक्रमक सरकारला इशारा दिला. आंतरवाली सराटी येथे आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच सरकारने मुंबईतील आझाद मैनामध्ये आंदोलनाबाबत मोठा निर्णय जारी केला, या निर्यायावरून जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत 90 लाख मराठे घुसतील. तुम्ही काय करता ते बघून घेऊ. आम्ही रेल्वे पण फिरू देणार नाही, विमान पण उडू देणार नाही. सगळ्या रेल्वे पटर्या उखडून टाकू. या वेळी मराठे 45 लाख गाडी घेवून मराठे मुंबईत घुसणार आहेत. असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दक्षिण मुंबईतील मोर्चे आणि आंदोलनांबाबत नेवे नियम लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे दिसून आले.
मुंबईत भगवं वादळ धडकणारच, असं म्हणत आम्हाला कोण आवडतंय, ते बघतोच,असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांना आंदोलनापासून रोखण्याचा निर्णय सरकारनं घेणं यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण होत आहे. ज्या जनतेनं,ज्या मराठी जनतेनं त्यांना सत्तेत बसवलंय, त्यांना हे सरकार मुंबईत येण्यापासून रोखतंय.
जनेतेनं सत्ता दिली, कायदा हातात दिला आणि सरकार त्यांचा उपयोग जनतेच्या विरोधात करतंय.सरकार सत्तेचा गैरवापर करतंय, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. ज्यांना आपलं म्हणून सत्तेत बसवलंय, आपले फडणवीस आपले शिंदे म्हणून त्यांना सत्ता दिली, तेच आता आम्हाला मुंबईत येऊ नका असं म्हणत आहेत. सत्ता म्हणजे काय पाच मिनिटे टिकू देणार नाही. असा गंभीर इशाराही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.
सरकार दादागिरी करत आहे. पण आम्ही त्याला दाद देत नाहीत,त्याला जुमानत आहे. मात्र आम्ही कायदा नक्कीच मानतो, त्यामुळे मुंबईत येणारच. त्यासाठी आधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी मागितली आहे. आंदोलनासाठी परवानगीचे निवेदन आधिच देण्यात आले आहे. जर परवानगी दिली नाही तर तुम्ही कायद्याचा सन्मान करत नाही हे सिद्ध होतं. पण मुंबईत आम्ही येणारच तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ. आमचं ठरलंय, मी जाणार रात्रंदिवस बसणार तुम्ही काय करणार ते आम्ही बघणार, तुम्ही मुंबईत कसे अडवतात हे पण बघतो, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, तुम्हाला मुंबईत अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा, तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही सत्तेतही बसायचं नाही. मुंबईतील बांधवांनी समजून घ्या, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का तर एखाद्या वेळेस नक्की होईल आम्हाला दहा- पंधरा दिवस सांभाळून घ्या, आम्ही तुमचेच आहोत लोकाचे नाही, असं अवाहनही जरांगें पाटील यांनी मुंबईकरांना केलं.
मुख्यमंत्र्यांना इशारा : तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, आता पुन्हा फडणवीस नादाला पडायचं नाही, आता आम्ही सावध आहोत. तुमच्यावर सगळ्यांचा राग आहे. दादागिरी करायची नाही. आम्ही आंदोलन आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षापुढेही करणार सगळ्या दुनियात करणार. जिथे आम्हाला रोड दिसेल तिथे आंदोलन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नादी लागू नका माझ्या. पोलिसांच्या जीवावर तुम्ही खेळ खंडोबा करायचं काम करू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.



Comments