top of page

ठाकरेंना धक्का देत भाजपने केला सरनाईकांचा गेम...

मतदारसंघातच केलं नवं अव्हान!



ree



ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा आणि जिंकण्याचा इरदा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अनेकदा जाहिर बोलून दाखविला आहे. या इराद्याला आनखी बळ देण्याच्या अनुषंगाने इतर पक्षातील नाराज पदाधिकार्‍यांचा या तीन नेत्यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करुन घेतला जात आहे. यातच आता घोडबंदर पट्टा मजबुत करण्यासाठी भाजपने एके काळी जायंट किलर ठरलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक लॅरेन्स डिसोजा यांना आपल्या पक्षात घेतले आहे. रविवारी (13 एप्रील) त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. लॅरेन्स डिसोजा यांच्या भाजप प्रवेशाचा थेट फटका शिवसेना (उ.बा.ठा) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.



लॅरेन्स डिसोजा हे 2012 मध्ये ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर माजीवडागांव परिसरातून निवडूण आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार देवराम भोईर यांचा त्यांनी परभव केला होता. शिवसेनेतील बंडा नंतरही डिसोजा यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. त्यांनी लोकसभा निवडणूकीत राजन विचारे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण आता माजीवडा प्रभागातील पॅनलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भवितव्य संपुष्ठात आल्याने त्यांना यंदाचे तिकीट मिळण्याची अपेक्षा मावळली होती. त्यामुळे भविष्याचा वेध घेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माजीवड्यात भाजपची ताकद वाढली आहे.


त्यांच्या सोबत त्यांची कन्या स्टेफनी डिसोजा आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लॅरेन्स डिसोजा यांना प्रवेश देत भाजपने ताकद वाढविलेला माजीवडा प्रभाग हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवाय ओवळा-माजीवडा हा विधानसभा मतदारसंघ हा भाग ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादीत नाही.


ठाण्यातील लोकमान्य नगर, वर्तक नगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर वाघबीळ, कासारवडवली, माजीवडा, गायमुखपर्यंतचा भागा याचा मतदारसंघामध्ये येतो. त्यावेळी मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या चेन्नागांव, घोडबंदरगाव, वर्सोवा, काशीमिरा, गोल्डननेक्स्ट, नवघर हे विभाग ओवळा- माजीवडा याच मतदारसंघात येतात. त्यामुळे डिसोजा यांना घेवून भाजपने केवळ ठाण्यातीलच नाही तर मिरा- भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आपली ताकद वाढविल्याची चर्चा आहे. यातूनच सरनाईक यांच्यापुुढेही अव्हान उभे राहिले आहे.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page