... तर अजित पवार, अमोल मिटकरींची कापडंही राहाणार नाहीत; अजित पवार पोल्ट्री चालवणारा माणुस, अमोल मिटकरी फडतूस- लक्ष्मण हाके

अजित पवार पोल्ट्री चालणारा माणुस पण काकाच्या जीवावर राजकारणात आला, अमोल मिटकरी हा फडतूस माणूस आहे, माझ्याकडे खूप मोठा शब्द साठा आहे त्याच्या भाषेत बोलायचे झाले तर अजित पवार आणि अमोल मिटकरी यांची कापडही अंगावर राहणार नाहीत. अशी टिका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
अजित पवार गेल्या 20 वर्षापासून अर्थ खात्याला चिटकून बसलेले आहेत त्यांनी काय पीएडी केली का अर्थशास्त्राची, ते साधे कोंबडी पोल्ट्री फार्म चालवणारे. यांनी भटके विमुक्त आणि मागास महामंडळाला 50 पैसे सुद्धा त्यांनी दिले नाहीत, अशी टिका लक्ष्मण हाके यांनी केली. दरम्यान, हाके यांना दिलेल्या फॉर्चूनर गाडीवरुन अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टिका केली होती. त्या टिकेला लक्ष्मण हाके यांनी प्रत्यूत्तर दिले. मी तुझ्या भाषेत उत्तर द्यायची वेळ आली तर तू आणि तुझा आका अजित पवार यांच्या अंगावर कापडंही राहणार नाहीत असा इशारा वजा उपरोधक टोलाही हाके यांनी लगावला.
अमोल मिटकरी फडतूस: लक्ष्मण हाके यांना ओबीसी बांधवांनी फॉर्च्यूनर गाडी भेट दिली आहे. यावर बोलताना हाके म्हणाले की, गाडी हे माझे साधन नाही, साध्य आहे. कोणाला टिका करायची ती करू द्या, अमोल मिटकरीला बाजारु विचारवंत असे म्हटले जाते. मिटकरी अजित पवारांच्या घरी झाडू मारतात, त्या बदल्यात त्यांना आमदारकी दिली आहे. मिटकरी तू विधानपरषिदेचा सदस्य आहेस, ओबीसीवर कधी बोलला का? अजित पवारांनी ओबीसीसाठी एक तरी वसतीगृह दिले का? अजित पवारांचे खासगी कारखाने अगणित आहेत असल्याचे सांगत आमोल मिटकरी यांची हाके यांनी थेट लाजच काढली.
काकांच्या जीवावर राजकारणात आला:
ज्या आण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो, पण ओबीसींच्या महामंडळाला दोन पाच कोटी अजित पवार देऊ शकत नाही, अजित पवार हे पोल्ट्री चालवणारा माणुस, काकांच्या जीवावर राजकारणात आला. मुळात सगळे सरकारमध्येच आहेत. महाराष्ट्राला विरोधकच उरला नाही. काँग्रेसमधील काही माणसं भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे हे सगळे भाजपमध्ये सामील झाले आहेत. दुर्दैव हे आहे की सामान्य माणूस आवाज उठवू शकत नाही त्याचे मरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचेही प्रसारमाध्यमांशी बोलताना हाके म्हणाले.



Comments