.. तर राज्यभरातील मराठे परळीच्या दिशेने कुच करतील... -सकल मराठा समाज, नांदेड
- Navnath Yewale
- Nov 11, 2025
- 1 min read

नांदेड : अखंड मराठा समाजाचे दैवत मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या माजी मंत्र्यासह सर्व आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणाची सत्यता महाराष्ट्राच्या समोर यावी यासाठी आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाचे प्रणेते पाच कोटी मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी पोट तिडके ने लढा देणारे मराठा नेते मनोज दादा जरांगे पाटील हे आता एक नाव राहिले नसून अखंड मराठा समाजासाठी दैवत बनलेले आहेत,आपल्या शरीराची चाळणी करीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळे आंदोलने आणि उपोषणे करून समाजाला न्याय मिळवून दिला.

अशा प्रामाणिक आणि इमानदार नेतृत्वाला कायमचे संपवण्यासाठी काही समाजविघातक लोकांनी कट रचल्याची बातमी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कानावर पडतात राज्यभरातील मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आणि जिल्हा जिल्ह्यातून मराठा बांधव आंतरवाली कडे कुच करू लागले आंतरवालीत पोहोचल्यानंतर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून काही गोष्टी कानावर आल्या या गटामध्ये राज्याचे माजी कृषी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचा थेट समावेश आहे, सद्द स्थितीत पोलीस चौकशी सुरू आहे दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत .
आमचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तपास हा एसआयटी मार्फत करून यातील सत्य बाहेर आले पाहिजे उर्वरित आरोपींना सुद्धा तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या कटाच्या पाठीमागे पुराव्यानिशी सर्व चौकशीअंति माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जर का हस्तक्षेप असेल आणि कटाचा मुख्य सूत्रधार तो असेल तर राज्यातील मराठा समाज परळीच्या दिशेने कुच केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण शेवटी प्रश्न हा पाच कोटी मराठ्यांच्या अस्मितेचा आहे
अस्तित्वाचा आहे.
आणि आमच्या नेतृत्वाचा आहे अखंड हिंदोस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आणि कुठल्याच समाजाविषयी अपशब्द न बोलणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था विसरून मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणून या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल अशी चौकशी करून दोषीनविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत पाठवण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत कट रचणाऱ्या च्या विरोधात घोषणा बाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील मराठा सेवक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Comments