... तर लक्ष्मण हाकेंची जीभ हसडणारास एक लाखाचे बक्षीस देऊ - गंगाधर काळकुटे पाटील, लक्ष्मण हाकेंचाही पलटवार
- Navnath Yewale
- Aug 22
- 3 min read

बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज मराठा आरक्षण मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जोडो अभियान राबवत राज्यभरातील जिल्हानिहाय दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अगदीच एकेरी भाषेत जरांगे पाटील यांच्यावर टीकेचा आरोप करत जरांगे पाटील यांचे सहकारी तथा मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा देत जरांगे पाटील यांच्या विषयी एकेरी भाषेचा उल्लेख केला, तर जीभ हासडणारास एक लाखाचे बक्षीसाचे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई ’ घोषणा केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही ‘ओबीसी जोडो अभियान’ घोषणा केली. जरांगे पाटील यांनी राज्यभराचा दौरा करून मराठा बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आहवान केले. त्यानुसार गावखेड्यांसह वाडी वस्ती तांड्यावर मुंबई आंदोलनाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ‘ओबीसी जोडो’ अभियान राबवत जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहेत. काल बीड येथे लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्यासह शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत हाके यांनी जरांगे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर एकेरी भाषेत बोलतो, त्याला आरक्षणाची अक्षर कळतंय का? यासह हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर वारंवार एकेरी भाषेत टीका केली.
हाके यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देताना मराठा आंदोलक तथा जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे म्हणाले की, येत्या 29 ऑगस्टला मनोज दादा जरांगे यांच्यासह राज्यातला मराठा समाज मुंबईला जाणार आहे. या पाश्वभूमिवर लक्ष्मण हाके हे ग्रस्त जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोज दादावर कित्तेक दिवसापासून खालच्या शब्दात टीका करत आहेत. सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतात, खालच्या भाषेत टीका करत आहेत. हे सर्व चूकीचे आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबाासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो. म्हणून माझं हाके यांना अवाहन आहे इथून पूढे चुकूनही मनोज दादाला वाईट, चूकीचं किंवा, त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा, शिंतोडे उडवणारं, त्यांच चारित्र्य हणन होणारं कुठलही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. आरे-तुरेची भाषा खपवून घेणार नाहीत. लोकशाहीमध्ये संविधानीक पद्धतीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू, स्वीकार करू. पण जर तुम्ही कंबरेखालची भाषा वापरली, अन् चुकीचं वक्तव्य मनोज दादांबद्दल केलं तर, तुमची जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातील मराठा समाज करेल.
जर, तुमची ही बेताल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असल तर, येणार्या काळात तुमची जीभ हासडणारास आम्ही एक लाख रुपयांचं बक्षीस देणार आहोत. असा इशाराही गंगाधर काळकुटे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, गंगाधर काळकुटे पाटील यांच्या इशार्या नंतर बीड दौर्यावर असलेले लक्ष्मण हाके यांनी पलटवार केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, लक्ष्मण हाकेंच आंदोलन कधी सुरू झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघीतलं. लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातील आंदोलनाची भाषा महाराष्ट्राने बघीतली आहे. पण ही भाषाच जर कुणाच्या पदावर जाणार नसंल. मी सांगतोय, आत्ता माझ्या प्रेस मध्ये मी संविधानाच्या तत्वाचा किती वेळा उल्लेख केला. ‘ क्यू रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट किती वेळा बोललो’.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी बारा-तेरा करोड जनतेच्या दायित्वाची आहे. किती वेळा बोलायचं मी संविधानीक. त्यामुळं च..., ट... पेक्षा तर मी वाईट बोललो नसेल ना.? महाराष्ट्राच्या संविधानीक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत हे सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची आय, माय तर मी कधी काढली नाही. त्यामुळं ज्याने काचेच्या घरात राहयचं अन् दुसर्याच्या घरावर दगडफेक करायची, असं मला त्यांना एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. बक्षीस जाहिर करावा त्यांनी आमचा जीव घ्यावा, आम्हाला गोळ्या घालाव्यात.
मंडल आयोग लागू होत असताना 90 च्या दशकामध्ये या महाराष्ट्रात मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील असं इथली माणसं बोललेली आहेत. त्यामुळं ही भाशा नवीन नाही आम्हाला. त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सूरी, जीभ काय हासडताय, चालवा आमच्यावर सूरी. आम्ही ओबीसीच्या हक्काधिकाराची भाषा बोलतो. चालवा गळ्यावर सूरी आमच्या. आम्ही तयार आहोत.
मी आत्ता विधाऊट पोलिस संरक्षणा शिवाय बीड जिल्ह्यात आहे आत्ता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय. मी जीव तळ हातात घेतलाय, हक्क अधिकाराची भाषा बोलतोय, हे कोणीतरी बोललं पाहिजे. जीभ काय हासडताय,जीव गेला तरी चालेल. घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्नही करून पाहिला. माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा, मग माझ्यासारखे अजूनही बांधव असतील. तुम्ही घ्या जीव, आम्ही एकटेच फिरत आहोत. तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत, तुम्ही धनाजी घोरपडेचा जीव घेतलाय. तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय. घ्या जीव आमचा पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठेही थांबवणार नाहीत.



Comments