तलासरीत भाजपची ताकद वाढली, विविध पक्षातील शेकडो कार्यर्त्यांचा पक्षप्रवेश
- Navnath Yewale
- Aug 23
- 1 min read

तलासरी : मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात काल एक भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, तर पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
विशेषतः तलासरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मधील माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर, सध्या कार्यरत पंचायत समिती सदस्य भाईलाल दुबळा आणि जिल्हा परिषद सदस्या गीता धामोडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश केला.
तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट चे माजी आमदार स्व. राजाराम ओझरे यांचे पुत्र सुधिर ओझरे – जे २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवले होते यांनीही सरपंच, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश करत पक्षबळ वाढवले.
या सोहळ्याची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाना बरफ यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या ऐतिहासिक प्रसंगी भाजपा तलासरी तालुकाध्यक्ष विवेक करमोडा यांनी सर्व नविन कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत म्हणाले, या पक्षप्रवेशामुळे तलासरी तालुक्यात भाजपाचे संघटन अधिक मजबूत होणार असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा निश्चितच मोठा परिणाम होईल.
"भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून एक कुटुंब आहे. आज या कुटुंबात नव्या सदस्यांचा समावेश झाल्यामुळे आमचं बळ अधिक वाढलं आहे. आपण सर्वांनी एकजुटीने पक्षवाढीसाठी व सामाजिक कार्यासाठी पुढे यावं, हीच अपेक्षा आहे."
विवेक करमोडा तलासरी तालुका अध्यक्ष भाजपा



Comments