top of page

तहसीलकार्यालयात दर्पण दिन उत्साहत; प्रशासनाकडून पत्रकारांचा सन्मान

बीड: अद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेर यांची जयंती, दर्पण दिन शिरुर कासार तहसील कार्यालयात उत्साहात साजारा करण्यात आला. तालुक्यातील विविध माध्यम प्रतिनिधींचा यावेळी तहसीलदार सुरशे घोळवे यांनी सन्मान केला.


आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज मंगळवारी (6 जानेवारी) शिरुर कासार शहरात दर्पण दिन साजरा करण्यात आला. आदर्श पत्रकार संघाच्या वतिने छत्रपती संभाजी महाराज चौकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनकरून मान्यवरांच्या उपस्थित सामाजिक, कुशल प्रशासन अधिकारी, उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या तीन मान्यवरांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.


तालुका निर्मीतीपासून आज पहिल्यांदाच तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करून तहसीलदार सुरेश घोळवे यांनी बाळाशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता, त्यासाठीचा संघर्ष आणि अधुनिक पत्रकारिता यावर विचार मांडले. तांत्रिक युगातील पत्रकारिता, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मिडिया, सोशल मिडियामध्ये विभागलेल्या पत्रकारितेसमोरील अव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन करत शासन स्तरावरून समाजातील बहूतांश घटकांना आर्थिक लाभाच्या विविध योजना कार्यान्वीत आहेत मात्र, कुठलाही आर्थीक स्त्रोत नसताना पत्रकार आजही आपल्या तत्वापासून तसूभरही हटलेला नाही.


दर्पण चा अर्थ आरसा मन आणि आरसा खोटं बोलत नाही. कितीही झपाट्याने आधुनिकरण होत असले तरी घडामोडीसाठी प्रत्यक्षदर्शीं महत्वाचा दुवा आहे त्यामुळे पत्रकारिता कायम राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासनस्तरावरून पत्रकारांसाठी मानधन स्वरुपाची योजना सुरू करायला हवी होती अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विविध माध्यमांचे सर्व पत्रकारबांधव उपस्थित होते.

Comments


bottom of page