top of page

त्यांच्याकडे सत्तेची, पैशाची मस्ती, आमच्याकडे निष्ठेची शक्ती ..हिंमत असेल तर, अहमदाबादचे नामांतर करून दाखवा , छत्रपती संभाजीनगरच्या विराट सभेतून उद्धव ठाकरेंची भाजपसह फडणवीसांवर सडकून टीका

छत्रपती संभाजीनगर: छ. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक शिवसेना-मनसे युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत विराट सभेस संबोधीत करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक प्रचारार्थ येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खडकेश्वर मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची आज (दि.10 जानेवारी) सभा पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात आजची सभा अभूतपूर्व आहे, मला 1988 च्या हिंदूह्रदय सम्राट पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची आठवण झाल्याने केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना सभाजीनगरचे नामांतर केले हो हे आम्ही गर्वाने सांगतो, तुमच्यात हिम्मत असेल तर अमित शहाचा मतदारसंघ असलेल्या अहमदाबादचं कर्णावती नामांतर करून दाखवा. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकणार का ? आत्ताच एक बातमी हाती आली की, बदलापुर मधील चिमुलीच्या अत्याचार प्रकरणातील दोन सह आरोपी, जे की ते आरएसएसचे कार्यकर्ते ओत अशी माहिती मिळते या पैकीच एक तुषार आपटे यास भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं.


विकृत माणसांना स्वीकृत करता, तुम्हाला विकृती चालते हे तुमचं हिंदुत्व. पूर्वीचा भाजप जो राष्ट्र प्रथम म्हणणारा मेला आहे. आता भ्रष्टाचारी, गुंड, बलात्कारी प्रथम भाजपा आला आहे. खरं तर भाजपमधल्या निष्ठावंती अवस्था अशी झाली आहे की उपर्‍यांची सेवा करावी लागते ‘ निष्ठावंताच्या खांद्यावर उपर्‍यांचे ओझे’ या चित्रपटातील गिताला लाजवेल अशी अवस्था भाजपच्या निष्ठावंतांची आहे.


मागील काळात ‘ कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशा जाहिराती मिरवणार्‍यांना आता तुम्ही ‘ कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ’ विचारण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरला वर्षातून 43 दिवस पाणीपुरवठा केला जातो. मी मुख्यमंत्री असताना किमान एका दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. माझी आडीच वर्षाची सत्ता असताना मुंबई महापालीकेत 70 हजार कोटींच्या ठेवी होत्या या मेवा भाऊने मुंबईकरांवर तिन लाख कोटींचं कर्ज करून ठेवलंय तेच छत्रपती संभाजीनगरकरांच झालं आहे.


भ्रष्टचार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसताय अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे घेवून कारवाईची मागणी तुम्हीच केली होती, आता त्यांच्या उपमुख्यमंत्री म्हणून मांडीला मांडी लावून बसता. ढीगभर, गाडीभर पुरावे खरे असतील तर चौकशी होइपर्यंत अजित पवारांना घरी बसवा अन्यथा पुरावे खोटे असतील तर फडणवीसांनी अजित पवारांची जाहिर माफी मागावी.


म्हणतात की आम्ही कामाचे श्रेय घेतो, मुंबईत कोस्टलरोड आम्ही केला, आम्ही मुंबईत केलेल्या कामांच्या होर्डिंग लावून लोकांच्या समोर जात आहोत. तुम्ही 2014 पासून केलेलं एकतरी काम दाखवा, निवडणुका आल्या की केवळ हिंदू- मुस्लिम करायचं. सभाजीनगरला येणांर पाणि हिंदूच्या घरी कधी आणि मुस्लिमांच्या घरी कधी येतं हे जसं सांगता येत नाही तस आमच्यात धर्मांधतेचं वितुष्ठ पसरवू नका. निवडणुका आल्या की महाराष्ट्रात घुसखोर शिरले, मुंबईत बांगलादेशी घुसखोर आले. आरे ते आले कसे? 2014 पासून सत्ता केंद्रात सत्ता तुमची आहे हे तुमच्या अमित शाह चे अपयश आहे. राष्ट्रीय सीमा त्यांना सांभळता येत नसल्याने बांगालादेशी घुसखोरी करत आहेत.


यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचा शेर ऐकला “ ए तो बंद करणे आए थे तवायफों के कोठे, मगर शिक्कोंकी खनखन सुनके खुद मुजरा कर बैठे” असे म्हणत भाजपवर निशाणा साधला. आम्ही श्रेय घेत नाहीत मोदींजींनी स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणली, तिथे फडणवीस कमंडलू घेवून उभे होते याचं श्रेय आम्ही घेत नाहीत. अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली.


आंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजपने छत्रपती संभाजीनगरकरांची दिशाभूल केली. सगळे उद्योग नागपूरला पळवल्याचा आरोप करत फडणवीसांवर निशाणा साधला.

Comments


bottom of page