दहावी बोर्डाचा निकाल उद्या होणार जाहीरदुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार
- Navnath Yewale
- May 7
- 1 min read

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. 8 मे रोजी म्हणजे उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1:00 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रूवावरी -मार्च 2026 मध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपतीसंभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण याव 9 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
निकालासंदर्भात सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात शिक्षण मंडळाकडून अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1:00 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहायला मिळेल. त्यामुळे विद्यार्थी- पालकांचे लक्ष आता उद्याच्या निकालाकडे लागले आहे.



Comments