धक्कादायक ; आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी बस नदीत सिंध नदीत पडली!
- Navnath Yewale
- Jul 30
- 1 min read
जम्मू- काश्मीरच्या गंदरबल मध्ये मुसळाधार पावसामुळे बस वळणावरून नदीत घसरली

जम्मू- काश्मीरमध्ये बुधवारी (30 जूलै) एक मोठा अपघात झाला आहे. आयटीबीपी जवानांन घेऊन जाणारी बस गंदरबल जिल्ह्यात सिंध नदीत कोसळली. त्यांनतर लगेचच, टनास्थळी सैनिकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अधिकार्यांनी सांगितले की, मुसळधार पावसात गंदरबल जिल्ह्यातील कुल्लन येथे इंडो- तिबेटीयन बॉर्डर पोलिस ( आयटीबीपी) कर्मचार्यांना घेऊन जाणारी बस सिंध नदी पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर काही शस्त्रे गायब आहेत. अधिकार्यांनी सांगितले की, बसमधील सैनिकांचा शोध आणि बचाव करण्यासाठी एसडीआरएफचे बचाव कार्य सुरू आहे. एसडीआरएफचे जवान त्यांच्या जीवाची पर्वा न करता सैनिकांना वाचवण्यात गुंतले आहेत.
दरम्यान सिंध नदीच्या कुल्लनमध्ये एसडीआरएफ गंदरबल आणि एसडीआरएफ सब कंपोनेंट गुंड यांनी संयुक्त शोध आणि बचाव मोहिम सुरू केली आहे. आयटीबीपी जवनांना घेऊन जाणारी बस कुल्लन पुलावरून सिंध नदीत पडली, ज्यामध्ये काही शस्त्रे गायब आहेत. आतापर्यंत तीन शस्त्रे सापडली आहेत, बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
या संपूर्ण घटनेबाबत, गंदरबलचे एसएसपी म्हणाले की, बुधवारी पहाटे गंदरबलच्या रेजिन कुल्लनमध्ये, मुसळधार पावसामुळे आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी एक रिकामी बस एका वळणावर घसरली आणि सिंध नदीत पडली या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची अधिक माहिती अद्याप उपलब्ध नाही.
Comments