top of page

धक्कादायक; कारागृहातील कैद्यांमध्ये गांजा वाटपावरून राडा

बीडच्या करागृह पोलिस कर्मचार्‍यास जीवे मारण्याच्या धमक्या; खोक्या भोसलेसह तीन कैद्यांविरोधात गुन्हा दाखल


ree

मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा कारागृह सतत चेर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्हा कारागृह सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. अशातच आता एक अज्ञात व्यक्तीने जिल्हा कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकला आणि यातील गांजा वाटपावरून चार न्यायाधीन बंदिवानात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे.


यावेळी कारागृह कर्मचार्‍यांनी धाव घेत बंदिवानाच्या हातातील चेंडू ताब्यात घेतला.यावरून बंदिवानी कर्मचार्‍यानाच जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


दरम्यान, याप्रकरणी कारागृह प्रशासनाने जिल्ह्याधिकार्‍यांसह कारागृह वरिष्ठांनी माहिती दिली. याच अनुषंगाने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून कारागृहात जाऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी गांजा बंदिवानानीच मागितल्याचे स्पष्ठ झाले. याप्रकरणी खोक्या भोसलेसह तिघा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोक्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला जामीन देखील मिळाला होता. आता खोक्याचा नवा कारनामा समोर आल्याने खोक्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.


काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहात गांजा आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलिस हवलादार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना, बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय उर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांनी गायकवाडची झडती घेतली असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी, फिकट आकाशी रंगाची चिरलेला बॉल आढळून आला. त्या बॉलमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळला.


त्यानंतर त्याच्या पँटच्या खिशातही झडती घेतली असता, हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि कांड्यासह अंमली पदार्थसदृश्य मुद्देमाल सापडला. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी अक्षय गायकवाडविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Commentaires


bottom of page