धक्कादायक: कोरोना लस आणि अचानक होणार्या मृत्यूंमध्ये संबंध?
- Navnath Yewale
- Jul 2
- 2 min read

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि एम्स यांनी संयुक्तपणे एक अभ्यास केला आहे, ज्याच्या आधारे असा दावा करण्यात आला आहे की, देशात अचानक होणार्या मृत्यूंचे कारण कोरोना लस नाही. देशात 40 वर्षाखाली लोकांमध्ये ह्रदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अणि विशेषत: कोरोना साथीनंतर, त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील पुष्टी केली आहे की, तरुणांमध्ये कोरोना लस आणि ह्रदयविकाराचा कोणताही संबंध नाही.
खरं तर, कर्नाटकातील हसन जिल्ह्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या एका विधानात ह्रदयविकारासाठी कोरोना लसीला जबाबदार धरले होते. परंतु केंद्र सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले की, कोरोना लस घाईघाईने मंजूर करण्यात आली आणि नंतर लस वेगाने वितरित करण्यात आली.
अशा परिस्थितीत, अचानक मृत्यूचे कारण कोरोना लस देखील असू शकते. त्यांनी लोकांना आवाहन केले आणि सांगितले की, ‘ जर कोणाच्या छातीत दुखत असेल, किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांनी ताबडतोब जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी आणि लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये’. यावर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील विविध एजन्सींनी अचानक झालेल्या मृत्यूंची चौकशी केली आहे. आणि तपासात असे अढळून आले आहे की, त्यांचा कोरोना लसीशी थेट संबंध नाही.
आयसीएमआर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानेही त्यांच्या अभ्यासात याची पुष्टी केली आहे. सरकारने म्हटले आहे की कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यामुळे क्वचितच गंभीर परिणाम झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अचानक मृत्यूची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये आनुवंशिकता, आपली जीवनशैली आणि दिनचर्या, कोरोनाची लागण झाल्यानंतर होणारा कोणताही आजार आणि समस्या यांचा समावेश आहे.
आयसीएमआर आणि एनसीडीसीने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये एक अभ्यास केला . हा अभ्यास मे 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत 47 प्रादेशिक रुग्णालये आणि 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आला. या अभ्यासात ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान, अचानक मृत्यू झालेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. या आभ्यासात असे आढळून आले की, हे अचानक मृत्यू कोरोना लसीशी संबंधित नाहीत. आता अयसीएमआरद्वारे निधी मिळविलेल्या एम्सद्वारे असाच एक अभ्यास केला जात आहे.
त्यानुसार अभ्यासामध्ये असे अढळून आले अहो की, अनुवंशिक उत्परिवर्तनांमळे ह्रदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना वाढल्या आहेत. हा अभ्यास अजूनही सुरू आहे. आणि तो पूर्ण झाल्यानंतरच अहवाल सार्वजनिक केला जाईल. सरकारने इशारा दिला की, केले जात असलेले दाव निराधार आहेत आणि कोरोना लसीवरील सामान्य लोकांचा विश्वास कमकुवत करतील, तर कोरोना लसीमुळेच कोरोना साथीच्या काळात लाखो लोकांचे प्राण वाचले. कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यास हसन जिल्ह्यात 20 हून अधिक लोकांचा अचानक मृत्यू झाल्याचा दावा केला होता हे उल्लेखनीय आहे.



Comments