धक्कादायक: चॉकलेटमध्ये अढळल्या जिवंत आळ्या; अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अकोला: प्रसिद्ध ब्रँड आणि नामाकिंत कंपन्यांच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा कीटक आढळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आता असाच एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला आहे. एका प्रसिद्ध कंपनीच्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत आळ्या वळवळताना आढळून आल्या आहेत. यामुळे चॉकलेट खाणार्या ग्राकांमध्ये विशेषत: लाहान मुलांच्या पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आकोल्यातील एका जागरुक नागरिकाने हा प्रकार कॅमेर्यात कैद केला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वार्यासारखा व्हायरल होत आहे. या गंभीर प्रकारानंतर संबंधित पालकाने अन्न आणि औषध प्रशासनासह ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, अकोला शहरातील कौलखेड भागातील रहिवाशी संतोष शेंदुरसे यांनी आपल्या लहान मुलासाठी जवळच्याच एका दुकानातून एका कंपनीचे चॉकलेट खरेदी केलं होतं. मूल चॉकलेट खाण्यासाठी हट्ट करत असल्याने त्यांनी घरी गेल्यावर चॉकलेटचे रॅपर उघडलं. मात्र, चॉकलेट उघडताच त्यांना मोठा धक्का बसला. त्या चॉकलेटवर लहान-लहान जिवंत आळ्या वळवळत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
दरम्यान, संतोष सेंदुरसे यांनी वेळीच लक्ष दिल्यानं त्यांचा मुलगा हे चॉकलेट खाण्यापासून वाचला, अन्यथा एका लहान मुलाला मोठ्या अन्नबाधेला सामोरं जाव लागलं असतं. नामांकित कंपन्यांच्या अशा निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप आता केला जात आहे.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संतोष शेंदूरसे यांनी आळ्या असलेल्या चॉकलेटचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकर्यांनी संंबंधित कंपनीच्या दर्जावर आणि पॅकेजिंगवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या संदर्भात संतोष शेंदूरसे यांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन आणि ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची अन्न सुरक्षा अधिकार्यांमार्फत चौकशी करून संबंधित दुकानदारावर आणि कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



Comments