top of page

धक्कादायक: भातातील दहा सर्वात विषारी शहरं


सीआरइए 2025 चा अहवाला; राष्ट्रीय राजधानीसह बिहार, आसाम-मेघालय सीमेवरील शहरांचा समावेश

ree

सेंटर फॉर एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च (सीआरईए) ने 2025 पहिल्या सहामाहितील देशभरातील हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवर आधारित एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानूसार, भारतातील सर्वात प्रदूषित शहर आता दिल्ली नाही तर आसाम-मेघालय सीमेवर स्थित ‘बर्निहाट ’ आहे. सीआरईए च्या विश्लेषणानुसार, बर्निहाटमधील हवेत पीएम2.5 ( 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून लहान करण) ची सरासरी एकाग्रता प्रति घनमीटर 133 मायक्रोग्राम नोंदवली गेली, जी अत्यंत धोकादायक पातळी आहे. त्याच वेळी, दिल्लमध्ये ही पातळी प्रति घनमीटर 87 मायक्रोग्राम होती. जी भारताच्या राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानक ( एनएक्यूएस) च्या दुप्पट आहे.


ज्यामध्ये बर्निहाट ( आसाम-मेघालय सीमा), दिल्ली (राष्ट्रीय राजधानी) हाजीपूर (बिहार), गाझियाबाद ( उत्तर प्रदेश), गुरुग्राम (हरियाणा), पाटणा (बिहार), सासाराम (बिहार), तालचेर (ओडिशा), रौरकेला (ओडिशा), राजगीर (बिहार) या शहरांचा समावेश आहे.

अहवालानुसार, दिल्लीसारख्या शहरांमध्ये जुन्या वाहनांवर बंदी घालण्यासारखे धोरण आवश्यक आहे. परंतु ते प्रदूषणाच्या फक्त एकाच स्त्रोतावर लक्ष केंद्रित करतात. वाहने, तर उद्योग, बांधकाम, कचरा जाळणे आणि धूळ यासारख्या इतर स्त्रोतांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. बिहार सरकारने (सीआरइए) अहवालावर आक्षेप घेतला आहे (बीएसपीसीबी) ने तो बनावट असल्याचे म्हटले आहे. सेंटर फॉर एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च (सीआरइए) च्या अहवालात देशातील 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये बिहारमधील चार शहरे - हाजीपूर, सासाराम, पाटणा, आणि राजगीरयांचा समावेश असला तरी बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला आहे.


मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सीआरइए अहवालाला एका खासगी एजन्सीचा दिशाभूल करणारा आणि अस्पष्ट अहवाल म्हटले आहे. आणि म्हटले आहे की, त्यात खर्‍या तथ्यांकडे दूर्लक्ष करण्यात आले आहे. बीएसपीसीबी च्या मते, वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक ठोस पावले उचलली जात आहेत, ज्यात हे समाविष्ठ आहे. तरीही हाजीपूर, पाटणा, सासाराम आणि राजगीर सारख्या शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेची परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. जी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून नियंत्रित केली जात आहे.


Comments


bottom of page