top of page

धनंजय मुंडे यांना बराशी खोदायला पाठवा रोजगार हामीवर - जरांगे पाटील

ree

चूक झाली असेल तर कान धरा, पण आता रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या, असे साकडे आमदार धनंजय मुंडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील सत्कार सोहळ्यात मुंडे यांनी केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यावर काय बोलतात याची उत्सूकता होती. धनंजय मुंडे यांचे हात रिकामे आहेत. त्यांना रेाजगार हमीच काम द्या, बराशी खोदायला त्यांना पाठवा, असा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला. धनंजय मुंडे यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये, असा इशारा देतानाच आम्ही मग अजित पवारांनाही सोडणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.


राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करणारे आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने जरांगे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामाही मागितला होता. एकूणच मराठा आरक्षणासाठीचा लढा जेव्हापासून जरांगे पाटील यांनी सुरू केला अगदी तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे खटके उडाले.


संधी मिळेल तेव्हा जरांगे पाटील धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असतात. या उलट मुंडे यांनी जरांगे यांच्यावर बोलणे कायमच टाळले. मंत्रीपद गेल्यापासून धनंजय मुंडे ते परत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. कायम सत्तेत आणि मंत्रीपदाची झुल अंगावर पांघरूण वावरण्याची सवय झालेल्या धनंजय मुंडे यांची चलबिचल सध्या वाढली आहे.


धनंजय मुंडे यांनी कर्जत मधील एका पक्षाच्या सत्कार कार्यक्रमात केलेल्या भाषणात ‘ चुकलो तर कान धरा, नाही चुकलो तर चालयं, पण आता रिकाम ठेवू नका, जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. आता त्यांच्या या विधानवरूनही त्यांच्यावर टीका होऊ लागल आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.


दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा धनंजय मुंडे यांच्या या मागणीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी धनंजय मुंडे यांना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवण्याचा सल्ला दिला. त्यांना बराशी खोदायला पाठवा, पण मराठ्यांचा नाद करू नका अन्यथा आम्ही अजित पवारांनही सोडणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Comments


bottom of page