धाराशीवमध्ये रामदास आठवलेंचा ताफा अडवला
- Navnath Yewale
- Aug 22
- 1 min read

धाराशीव: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले धाराशीवकडे जात असताना सारोळा गावात मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत आंदोलकांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलकांच्या भावना लक्षात घेत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे अश्वासन आठवले यांनी दिले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे धाराशीवकडे जात असताना सारोळा गावात मराठा आंदोलकांनी ‘ एक मराठा, लाख मराठा’ ची घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी रामदास आठवले यांचा ताफा अडवला. रामदास आठवले यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधत मागण्यांचे निवेदन स्विकारले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येण्याची वेळ येऊ देवू नये, तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली.
रामदास आठवले यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मार्ग काढण्याचे अश्वासन रामदास आठवले यांनी आंदोलकांना दिले. यावेळी मराठा आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी जोरदार घोषणाबाजी करत रामदास आठवले यांचे मागण्यांकडे लक्ष वेधले.



Comments