धीरेंद्र शास्त्रींचे उर्फ बागेश्वर बाबाचे छत्रपती शिवाजी महाराजंबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले, अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

नागपूर: बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र शास्त्री तथा बागेश्वर हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळले आहेत. नागपूरात भारतदुर्गा शक्तिस्थळचा शिलान्यास समारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र पडसाद उमले असून शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करत सोशल मीडियावर निषेध नोंदवण्यात येत आहे.
नागपूर येथील भारतदुर्गा शक्तिस्थळाच्या शिलान्यास कार्यक्रमास संबोधीत करताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “ छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो आहोत. ते एक दिवस समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपले मुकूट उतारले आणि सांगितलं की, आम्ही खूप थकलो. आता कृपा करा की, आम्हाला खूप लढायचं नाही. एक मोठी दया करा, हे मुकूट आपण सांभाळा. हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आता आमच्याकडून पुढे चाललं जात नाही. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही आता खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा आहे. आता आम्ही काही दिवस काही करू इच्छित नाहीत.”
“शिवरायांच्या या म्हणण्यावर स्मितहास्य करत समर्थ रामदास स्वामी भगवान म्हणाले, ठिक आहे, आम्हाला स्वीकार आहे. पण एक गोष्ट आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही आमचे कोण आहात? ते (छत्रपती शिवाजी महाजराज) म्हणाले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत? तर म्हणाले गुरू आहात. मग शिष्यचं कर्तव्य काय? असा सावाल रामदास स्वामींनी केला. त्यावर जो गुरु अज्ञा देणार त्याचं पालन करण्याचं कर्तव्य शिष्याचं आहे, असं शिवाजी महाराज म्हणाले. समर्थ रामदास स्वामी यांनी मुकूट उचलला आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले , आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालणार. पण अज्ञा तुम्हाला आहे. तुम्हाला संचालन करायचं आहे” असा धक्कादायक दावा करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल धीरेंद्र शास्त्रींनी वदग्रस्त वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले मला सांगायचं आहे की, देवाच्या आज्ञेने भारतमाताच्या आज्ञेने आपल्या सगळ्यांचा गौरव आहे की, अशा महापुरुषाने या भूमीवर जन्म घेतला, वर्तमानात ते संघाचे प्रमुख आहेत. पण त्यांनी भारताच्या गौरवाला विश्वपटलावर विस्थापित करण्यासाठी आपलं जीवन दिलं , तन,मन,आयुष्य दिलं. आम्हाला विश्वास आहे की, ज्यादिवशी भारतमाता दुर्गामंदिर बनेल त्यादिवशी भारत शक्ती संपन्न होईल आणि अखंड भारत होईल,”
“भारतीय सनातनी परंपरेत जन्म घेतल्याने आज आणखी गौरव होत आहे. आम्ही धन्य आहोत, ज्या देशात आम्ही जन्म घेतला तिथे मातृ प्रधानता आहे. अशा देशात भारतदुर्गामाता मंदिराचे भूमीपूजन होत आहे.” असंही बोगेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.



Comments