धुळीचे लोट, तुंबलेल्या नाल्यां वाहतूक कोंडीतून सुटका कधी? शिरुरशहरवासीयांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रस्तावीत कामांना मुहूर्त सापडेना!
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

बीड: शहराच्या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूच्या तुंबलेल्या नाल्यांमुळे रस्त्यावरुन प्रवाहीत होणार दुर्गंधीयुक्त पाणी. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धुळीचे लोट, निमुळत्या रस्त्यांमुळे कायमची वाहतूक कोंडी समस्यांशी झुंजणार्या शिरुर (का.) शहरवासीयांचा मुलभूत गरजांसाठीचा संघर्ष पचविलाच पुजलेला. तालुक्याचे ठिकाण, बाजारपेठेचे शहर असताना या शहरवासीयांसाठी हक्काच्या मुलभूत गरजा दुरापास्त झाल्याने नागरिकांना आरोग्यासह विविध समस्यांना तोंड द्यावी लागत आहे.
शिरुर कासार शहरातील जिजामाता चौक - छत्रपती संभाजीराजे चौक, सिद्धेश्वरचौक- गोमळवाडा चौक या मुख्यरस्त्यांची नाल्यांची समस्या कायम आहे. जिजामाता चौक ते छत्रपती संभाजीमहाराज चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचे बांधकाम अतिक्रमण धारकांच्या हितासाठी निम्यावरच थांबवण्यात आले त्यामुळे जिजामाता चौकापासून प्रवाहित होणार्या नाल्या ऐन मध्यभागीच कोंडल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी मुख्यरस्त्यावर साचतेे. स्थानिक प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करून दोन्ही नाल्यांचे पाणी शहरच्या विस्तारीत भागातील छोट्या नाल्यात सोडले असले समस्येतून तात्पुरता मार्ग शोधण्याचा प्रकार आहे. सिद्घेश्वर चौक ते गोमळवाडा चौक या रस्त्याला तर नाल्याच नाहीत त्यामुळे निवासी क्षेत्रातील सर्व सांडपाणी मुख्यरस्त्यावरुनच प्रवाहीत होते.
डांबर, काँक्रिट खरडून गेल्याने दुरावस्थेमुळे मुख्यरस्त्यारुन धुळीचे लोट सर्वत्र पसरल्याने व्यवसायिक नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावी लागते. शिवाय व्यवसायिकांच्या अस्थापनेमध्ये फुपाट्यांचे थर साचत असल्याने स्वच्छतेच्या समस्यांशी दोन हात करावे लागतात. खड्यात हरवलेल्या, निमुळत्या रस्त्यावरुन जिव मुठीत घेवून वाहतूक करणार्या वाहन चालकांना कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्यातच धुळीच्या लोटामुळे श्वसनाचा त्रासाला समोरं जावं लागत आहे .
शहरांतर्गत नाल्यांची सफाई, मुख्यरस्त्यांच्या बाजूला साचलेल्या कचर्यांचे ढिगारे आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे रस्त्यावरुन प्रवाहीत होणारे दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे कामानिमीत्त शहरात येणार्या बाहेरगावच्या नागरिक स्थानिक जबाबदार प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत. कायम मुलभूत गरजांसाठी संघर्ष करणार्या शिरुर शहरवासीयांना आरोग्यसह इतर समस्यांना तोड द्यावी लागत असल्याने या जटील समस्यांतून सुटका होणार अधी? असा प्रश्न शहरवासीयांतून केला जात आहे.
स्वच्छतेला प्रथम प्राधान्य म्हणून शहरातील जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मुख्यरस्त्याच्या दुतर्फा नाल्यांवरील अतिक्रम हटवून तुंबलेल्या नाल्या प्रवाहीत करण्यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे. वाहतूकीस अडथळा ठरणार्या अतिक्रमणांवर कारवाई निश्चित आहे. शहरातील दोन्ही रस्त्यांचे मजबुतीकरण प्रस्तावीत असून बुधवारी (दि.25) शहरांतर्गत स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे.
गणेश दहिफळे
मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय



Comments