नवरदेवाचा बुट नवरीची चप्पल लापवल्यावरुन लग्नमंडपातच वर्हाडी आपसात भिडले , जालनातील लग्नातल्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल; आंबड पोलिसात दोन्ही पक्षाकडील लोकांवर परस्परविरोधात गुन्हे
- Navnath Yewale
- 19 hours ago
- 1 min read

जालना: विवाह म्हटलं की, पाहूण्यांचा मेळा, वधू-वरांचा सुरेल संगम आणि मित्र परिवाराची मौज अशा द्विगूनीत आनंदाचा क्षण म्हणजेच विवाह सोहळा. दूरचं नातं जवळ येतं, नात्याची विण घट्ट करणार्या विवाह सोहळ्याच्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध परंपरा आहेत. महाराष्ट्रातही विविध भागात वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. विवाह सोहळ्यात लहान थोरांपासून सर्वचजन आनंद साजरा करतात. मात्र, किरकोळ कारणावरुन विवाह सोहळ्याचा आनंदान विर्जन पडावे! असाच प्रकार असा प्रकार जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा होत आहे. झाले असे नवरदेवाचा बुट आणि नवरीची चप्पल लपल्याने लग्न मंडपातच वधू आणि वरपक्षाच्या मंडळीमध्ये मोठा राडा झाला.
जालना च्या नांदी (ता. अंबड) येथे रविवारी (दि.3) विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट नवरीकडील मंडळींनी लपवला तर नवरीची चप्पल नवरदेवाच्या भावाने लपवली. यावर नवरीच्या काकाने नवदेवाच्या भावास ठोसा मारला. यातूून दोघात वाद झाल्याने दोन्ही बाजूच्या वर्हाडमंडळीत आपसात हानामारी सुरूक्ष् झाली.
लग्न मंडपात अचानक दोन्ही बाजूच्या मंडळीमध्ये वाद उफाळून आल्याने नवरदेवाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचेही कोणी ऐकले नाही. या प्रकरणी वधू कडील 14 जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. नवदेवाकडील 7 जणांवर गुन्हादाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवरदेवाकडील मंडळींचे 15 ग्रॅम सोन्याचे दागिने देखील चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल: या विवाह सोहळ्याचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये दोन्ही पक्षाकडील वर्हाडी एकमेकांना मारहाण करत आहेत. मारहाणीमध्ये महिलांचाही समावेश आहे अनेक महिला एकमेकींना मारत आहेत. तसेच पुरुषही आक्रमक होत एकमेकांना ठोसे पहायला मिळत आहे. किरकोळ कारणामुळे झालेल्या या भांडणाची चर्चा आता संपूर्ण राज्यात होताना दिसत आहे. मारताना दिसत आहेत.



Comments