top of page

नांदेडमध्ये मराठा-ओबीसींचा सुप्तसंघर्ष ज्ञाणमंदीराच्या प्रांगणात!

मराठा पालकांचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याच्या शिक्षण संस्थेतून काढले पाल्यांचे दाखले

ree

अखिल भारतीय विरशैव शिवा संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळ रिसनगावच्या जवळपास 30 मराठा पालकांनी धोेंडे यांच्या शिक्षण संस्थेमील पाल्यांचे दाखल काढण्याचा निर्णय घेतला आहे.



मराठा, ओबीसी आरक्षणाचे पडसाद गावच्या वेशीत पोहोचले आहे. गावातल्या गल्लीबोळात जातीय सलोखा बिगडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. अखिल भारतीय विरशैव शिवा संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे यांनी मराठा समाजास हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदीनुसार कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी लागू केलेल्या जीआर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

ree

मनोहर धोंडे यांनी जाहीररित्या मराठा आरक्षण विरोधी भुमिका घेतल्याने नांदेडच्या रिसनगांव (ता. लोहा) येथील मराठा पालकांनी थेट धोंडे यांच्या गावातील मिनाताई ठाकरे आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्यांचे दाखले काढण्यासाठी अर्ज केले आहेत. मनोहर धोंडे यांच्या मराठा द्वेषी भूमिकेमुळे आम्ही आमची पाल्य त्यांच्या खासगी शिक्षण संस्थेमधून सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकत असल्याचे गावातील जवळपास 30 मराठा पालक म्हणाले. दरम्यान, मनोहर धोंडे यांची आत्तापर्यंतची भूमिका समावेशक असल्याची आमचा भास होता. पण त्यांनी मराठा आरक्षणा विरोधात थेट कोर्टात आव्हान देत, मराठा समाजाचा द्वेश करत ओबीसीचे स्वयंघोषीत नेते होण्याचा किवीलवाणा प्रयत्न केला आहे. किमान यामुळे तरी आम्हाला मनोहर धोंडे यांचे मराठा समाजाविषयी खरे रुप पाहावयास मिळाल्याच्या भावना पालकांनी बोलून दाखवल्या.


त्याचबरोबर पालकांनी मिनाताई ठाकरे आश्रम शाळा ही निवासी आहे का? शाळेतील सर्व शिक्षक एकाच विशिष्ठ समाजाचे कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत पालकांनी शाळेच्या गैरप्रकाराकडेही बोट दाखवले.


गावातील ओबीसींही आक्रमक

रिसनगावातील मराठा पालकांनी घेतलेल्या निर्णयाला शह देत ओबीसींही आक्रमक झाले. ओबीसी पालकांनीही मराठा संस्थाचालकाच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे दाखले काढण्याचा इशारा दिला. दरम्यान, मनोहर धोंडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा संस्थेशी काही संबंध नाही, ती त्यांची न्यायालयिन लढाई आहे. न्यायालयाचा निर्णय अंतिम राहिल असे म्हणत मनोहर धोंडेच्या ओबीसी समर्थकांनी संस्थेसमोर घोषणाबाजी केली.

Comments


bottom of page