top of page

नाशिकच्या टीसीएस मधील धक्कादायक पॅटर्न उघड; 20 ते 25 वयोगटातील मुली टार्गेट

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील नामवंत आयटी कंपनी आहे. टीसीएस मधील बाहेर आलेल्या प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. नाशिकच्या टीसीएस मध्ये हे सर्व घडलं आहे. नाशिकच्या टीसीएस मध्ये काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍याने समोर येऊन तिथे तरुण महिलांना कशा प्रकारे टार्गेट केले जायचे? हा पॅटर्न काय होता? या बद्दल माहिती दिली आहे. “ ज्या महिलांना टार्गेट करायचे त्यांना एकटं पाडलं जायचं? त्यांना वेगळं बसवलं जायचं. त्यांना इमरातीच्या गच्चीवर कामाला बसवलं जायचं. फोन आण खाजगी वस्तू जप्त केल्या जायच्या. हा टार्गेट करण्याचा पॅटर्न आहे” असं या महिला कर्मचार्‍यांचं मत आहे.


ज्या महिलेने हे सर्व सांगितलं जी गेल्या सहावर्षांपासून टीसीएस मध्ये नोकरीला आहे. व्हिडिओ कॉलवरुन ती एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलली. तिने सांगितलं की, “ तिची नाशिक टीसीएस ऑफिसला बदली करण्यात आली. त्यानंतर तिला मुख्य इमारतीपासून लांब गच्चीवर स्वतंत्रपणे काम करण्यासाठी बसवण्यात आलं. मला गच्चीवर एकट्याला काम करण्यासाठी बसवायचे. माझा फोन, बॅग जप्त करण्यात आली असं ति म्हणाली. “ मी वॉशरुम किंवा अन्य कुठल्या कारणांसाठी जेव्हा पायर्‍या उतरुन खाली याचे तेव्हा सुरक्षा किंवा अन्य काही कारणांखाली माझा मोबाईल फोन, बॅग आणि अन्य वस्तू जप्त केल्या जायच्या ” असं ती म्हणाली.


“ कंपनीत काम करणार्‍या अनेक तरुण कर्मचार्‍यांच शोषण होताना आम्ही पाहिलं आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जायचं” असं ती महिला म्हणाली. “ 20ते 25 वयोगटातील मुली सॉप्ट टार्गेट असायच्या” असं या महिला कर्मचार्‍याने सांगितलं. “ त्यांना असं वाटायचं की, यांना अडकवणं सोपं आहे. तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही त्या एचआरकडे घेऊन जा. पण तिथे एचआरच घाबरलेली होती. देवाची कृपा आहे माझ्यावर. मी नशिबाने वाचली. आज जे इतरांसोबत झालं, तेच माझ्या बाबतीत घडलं असतं, असही या महिलेने सांगितलं.


ऑफिसमधील सर्व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम: या महिलेच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. विषय सार्वजनिक झाल्यामुळे आता त्यांना तिच्या सुरक्षेची चिंता आहे. टीसीएस च्या या महिला कर्मचार्‍याने सर्व महिलांना एकत्रित होऊन ऑफिसमधील ही जी काळी बाजू आहे, त्या विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. हा वद आणि तपास यामुळे नाशिक ऑफिसमधील सर्व कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम सांगितलं आहे.

Comments


bottom of page