पंतप्रधान मोदींचे दृष्टीकोन बरोबर नाहीत, हे संविधान नष्ट करण्याचे षडयंत्र - राहूल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर देशाच्या संस्थात्मक संरचनांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. जर्मनीतील बर्लिन येथील हर्टी स्कूलमध्ये ‘ पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ लिसनिंग’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकार तपास यंत्रणांना राजकीय शस्त्रांमध्ये बदलत आहे. त्यांनी कडक शब्दांत टिप्पणी केली की, अंमलबजावणी संचनालाय (इडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) सारख्या संस्था निवडणुकपणे वापरल्या जातात, म्हणूनच भाजपविरुद्ध नाममात्र खटले आहेत आणि बहुतेक राजकीय खटले सत्ताधारी पक्षाच्या विरोधकांवर केंद्रीत आहेत.
हे ही पहा: लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा,https://youtu.be/CZT-d0k7nfU
राहुल गांधींनी असाही आरोप केला की, “ काँग्रेसला पाठिंबा देणार्या व्यावसायिकांना धमकीचा सामना करावा लागतो. भाजप राजकीय शक्ती मजबुत करण्यासाठी राज्य संस्थांचा वापर करत आहे” राहुल गांधींनी यावर भर दिला की हा “ लोकशाहीवर थेट हल्ला” आहे. परंतु विरोधी पक्ष याचा प्रतिकार करतील.
“हि लढाई केवळ भाजप नावाच्या पक्षाविरुद्ध नाही तर भारताच्या संस्थात्मक व्यवस्थेवरील त्यांच्या नियंत्रणाविरुद्ध आहे.” दरम्यान, राहुल गांधींच्या भाषणाचा हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केला आहे.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “ भारतातील अनेक लोक पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतात, परंतु आम्ही त्यांच्या विचारासरणीशी आणि भारतासाठीच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमत नाही. आम्हाला विश्वास आहे की, हे दृष्टिकोन अपयशी ठरेल आणि त्यात अनेक समस्या निर्माण होतील. यामुळे भारतात खूप तणाव निर्माण होईल आणि भारतीय एकमेकांशी लढतील, ही दोन विचारसणींमधील लढाई असेल.”
हे ही पहा: लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, https://youtube.com/shorts/anWnG5y-7x4?feature=share
“नोटबंदी हा रोख प्रवाहावर हल्ला होता. भारतात मोठ्या उद्योगांसाठी जागा आहे. सर्व वेगवेगळ्या पातळ्यांवर इतर अनेक खेळाडू आहेत आणि सरकारने त्यांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या पाठिंबा दिला पाहिजे. आमची उत्पादन क्षमता कमी झाली आहे.” काही राज्या आणि स्थानिक निवडणुकांमध्ये मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत, ज्याला त्यांनी धोरणात्मक स्पर्धा म्हटले. अलायन्समधील सर्व पक्ष धोरणात्मकदृष्ट्या भिन्न असले तरी, आरएसएस च्या जागतिक दृष्टिकोनाला विरोध करण्याच्या मुख्य मुद्यावर ते एक आहेत. संसदेत कायद्यांना विरोध करण्यावर युती एक आहे आणि पर्यायी भारत शोधण्यासाठी हा संघर्ष निवडणुकांपलीकडे जातो.
राहुल गांधी यांनी भाजपवर संविधान आणि राज्ये, भाषा आणि धर्म यांच्यातील समानतेच्या तत्वाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाचा आरोप केला. ते म्हणाले की, “ लाखो लोकांचा असा विश्वास आहे की भारत एका व्यक्तीच्या इच्छेने चालवता येत नाही ”
राहुल गांधी पाच दिवसांच्या जर्मनीच्या दौर्यावर आहेत. त्यांनी यापूर्वी आरएसएस वर प्रमुख संस्थांवर कब्जा करण्याचा अरोप केला आहे. निवडणूक सुधारणांवरील संसदीय चर्चेदरम्यान, त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे वर्णन संवैधानिक संस्थांवर कब्जा करण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून केले.



Comments