पक्षातील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे उद्या करणार सरकारला घाम फोडणारी घोषणा ; पत्रकार परिषदेचे आयोज, राजकारणात घडामोडींना वेग
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

मुंबई: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या- ज्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात फुट पडली, त्या सर्व सहाही मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभांतून सत्ताधारी महायुतीसह बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली.
पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.3) पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठकारे मोठी घोषणा करणार आहेत. राम मंदिर दान घोटाळ्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदेालनाची घोषणा करण्यात येणार आहे. उद्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राम मंदिर आणि हनुमान मंदिर महाआरतीचे अयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात महाआरतीचे अयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. दादर पश्चिम येथील हनमान मंदिरामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून रामरक्षा महाआरतीचे अयोजन करण्यात असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत खरासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या पंधरवाड्या दोन मोठे धक्के बसले आहेत. सहा खासदारांच्या बंडखोरी नंतर मतदारसंघात दौरे सुरू असतानाच ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन आहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सहभागी होवून महायुतीकडून विधानपरिषदेचे उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या देखील आडचणी वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांची उद्याची पत्राकर परिषद महत्वाची असणार आहे. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स आकाऊंडवरून दिली आहे.



Comments