top of page

पाकिस्तानने अवघ्या तीन तासांत दाखवली लायकीउधमपूरमध्ये ड्रोन-मिसाईल हल्ला; एलओसीवर फायरिंग


ree

शस्त्रसंधीनंतर पाकिस्तान चार तासही आपल्या अश्वासनावर टिकू शकला नाही. युद्धबंदी जाहिर झाल्यानंतर लगेचच निंयत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानने जोरदार गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तान सैन्याने अखनूर, सुंदबरनी, राजौरी आणि सांबा सेक्टरमध्ये गोळीबार सुरूच ठेवला आहे . राजौरमध्ये परिस्थिती पाहून वीजपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला, ज्यामुळे तिथे अंधार झाला आहे. याशिवाय, उधमपूरमध्ये पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, त्यानंतर सायरन वाजू लागले आणि ब्लॅक आऊट झाले.


जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि पठाणकोट यथूनही मोठ्या स्फोटांचे आवाज झाल्याचे सांगण्याता येत आहे. त्यानंतर दोन्ही ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आले. श्रीनगरमध्ये 20 मिनिटांत 50 स्फोटांचे आवाज ऐकू आले. श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला, पण भारतीय सैन्याने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण श्रीगरमध्ये ब्लॅक आऊट लागू करण्यात आला आहे. जम्मूच्या अखनूर सेक्टर, राजौरी आणि पूंछच्या मेंढर भागातही पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.



अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रंसंधी झालेली असतानाही पाकिस्तानने पुढच्या चार तासांमध्येच आगळीक केली आहे. त्यामुळे या शस्त्रसंधी करारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पाकिस्तानने लष्करी कारवाई न करण्याच्या परस्पर कराराचे उल्लंघन केले, अशी भूमिका भारत सरकारकडून घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत पाकिस्तानकडून भारतात 11 ठिकाणी युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे, सं सरकारच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Kommentare


bottom of page