top of page

पालखीमार्ग प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच ओढावली आपत्ती

शिरुरमध्ये सिंदफणा नदी पात्रच अडवले; चार वर्षापूर्वी मागणीद्वारे केली धोक्याची संभावना, प्रशासनाचे दूर्लक्षामुळे शहराच्या बाजारतळातील कुटुंब, व्यवसायीकांचे संसार उघड्यावर

ree

बीड: नियोजीत पैठण- पंढरपूर पालखी मार्ग सिंदफणा नदीच्या पूरनियंत्रण रेषेबाहेरुन संपादीत क्षेत्रातून मार्गस्थ करण्याची मागणी चार वर्षापूर्वी मागणी करण्यात आली होती. नियोजीत पालखी मार्गाचे कामामुळे नदीचा प्रवाह बदलणार असल्याचा धोका मागणीद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील जबाबदार प्रशासने नदीपात्र अतिक्रमीत करून पालखी मार्गाचे कामासाठी मोठा भराव केला. त्यामुळे नदीचा प्रवाह बलला आणि बाजारतळ महापूरात बुडाला. पालखी मार्ग प्रशासनाच्या

निष्क्रियेतेमुळ 22 कुटुंबांसह शेकडो व्यवसायिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले.


ree

ढगफूटी सदृष्य पावसामुळे मराठवाड्यासह राज्यात प्रचंड नुकसान झाले. शेतीपिकासह खरडून गेली नदी- नाल्यांच्या पूरात जनावरांसह माणसंही वाहून गेली. कधी नव्हे ते नदी-नाल्यांचे रौद्र रुप पाहावयास मिळाले. बीडच्या शिरुर कासारमध्ये गोदावरीची उपनदी असलेल्या सिंदफणाचे पैठण-पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाने प्रवाहात अडथळा निर्माण केल्याने बाजारतळ महापूरात बुडाला. हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे संसार उघड्यावर आले तर शेकडो व्यवसायिकांचा कोट्यावधींचा व्यवसाय वाहून गेला. पैठण- पंढरपूर पालखी मार्गाच्या काम गेल्या दहा वर्षापासून प्रगती पथावर आहे. राज्यातील पाच जिल्ह्यातून मार्गस्थ होणारा पैठण- पंढरपूर पालखीमार्गामुळे दोन्ही तिर्थ क्षेत्रांना जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. शिरुर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगांव ते पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, दिघोळ जवळपास 77 किलोमिटरचा अंतर पैठण-पंढरपूर पालखी मार्गाने बीड जिल्ह्याचा व्यापलेला आहे.


शिरुर कासार शहरालगत दहिवंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून वारणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राकडे मार्गस्थ होण्यासाठी पैठण- पंढरपूर मार्गाचे नियोजीत काम सिंदफणाची पूरनियंत्रण रेषा हद्द कायम करून संपादीत क्षेत्रातून पुलासह मार्गाचे काम करणे अपेक्षीत होते. तसी लेखी मागणी पद्मश्री सय्यद मामू यांनी सन 2021 मध्ये वृत्तमानच्या सहकार्याने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी बीड, अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे केली होती.


ree

दरम्यान, लेखी मागणीनुसार पद्मश्री सय्यद मामू यांनी सिंदफणा नदीची पूर नियंत्रण रेषा हद्द कायम करून संपादीत क्षेत्रातूनच नियोजीत पालखी मार्गाचे काम करण्यात यावे, जो पर्यंत पूर नियंत्रण रेषेची हद्द कायम होत नाही तो पर्यंत नियोजीत प्रगती पथावरील काम तहकुब करण्यात यावं, मर्जीतल्या लोकांच्या फायद्यासाठी पूर नियंत्रण रेषेच्या आत नदीपात्रात भराव करून महामार्गाचे काम करू नये अशा विविध मुद्दे नमूद करत संभाव्य काळातील महापूराचा धोक्याकडे लक्ष वेधले होते. सिंदफणा पात्रात उत्तर दिशेला जवळपास 25 फूट भरावा करून नदी पात्राची हद्दच मिटरची काही फूटात झाली आहे.


दरम्यान, सिंदफणा नदी शहराच्या बाजारतळामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाहित होते. पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे नियोजित काम जवळपास 200 मिटर पूर्वेकडून पश्चिमेकडे मार्गस्थ करण्यात आले आहे. त्यातच एका नल्याच्या पुलाचे कामाही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाच्या संरक्षण कठाड्यासाठी चक्क नदी पात्रातच जवळपास 25 फूट भरावा करण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे सिंदफणाच्या महापूराने थेट सिद्धेश्वर मंदिरापासूनच प्रवाहाची दिशा बदलली आणि संपूर्ण बाजारतळ महापूरात बुडाला.

पद्मश्री सय्यद मामू यांनी चार वर्षापूर्वी अधोरेखित केलेला धोका प्रत्यक्षात उतरल्याने या हानीला पैठण- पंढरपूर पालखी मार्ग प्रशासनाचे जबाबदार अभियंता, कंत्राटदार कंपनी व नियुक्त यंत्रणा आहे. बाजारतळातील पुर नियंत्रण रेषेतील कुटुंब व व्यवसायिक नियोजीत पालखी मार्गाच्या अस्तीत्वापूर्वी पासून स्थायिक आहेत. पालखी मार्गाच्या नियोजित कामापूर्वी प्रशासनाला संभाव्य धोक्या बाबत लेखी तक्रार, अर्ज केलेले असताना बेजाबदार, निष्काळजी धोरण, शिवाय अधिकाराचा गैरवापर करून ठरवून नियोजीत पालखी मार्गाचे काम संपादीत क्षेत्र वगळून नदीपात्रा घातले. त्यामुळे बाजारतळातील कुटुंब, व्यवसायिकांच्या नुकसानीची भरपाई पैठण- पंढरपूर पालखी मार्ग प्रशासनाकडून वसूल करून बाधीतांना देण्यात यावी यासाठी न्यायालयिन मार्ग अवलंबिण्यात येणार आहे.


ree

सिंदफणा नदी पात्र कायम राहण्यासाठी मी पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे नियोजीत कामा पूर नियंत्रण रेषेची हद्द कायम करून संपादीत क्षेत्रातून करण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीनगर, बीड, याठिकाणी जबाबदार प्रशासनकडे 2021 मध्ये केली होती. पण माझ्या मागणीला बगल देण्यात आली त्यामुळे आज शिरुर शहराच्या बाजारतळातील 22 कुटुंब उघड्यावर आले व्यवसायिकांची हानी झाली याला पैठण- पंढरपूर पालखी मार्गाची यंत्रणा जबाबदार आहे.

पद्मश्री शब्बीर सय्यद

दहिवंडी, शिरुर कासार

Comments


bottom of page