top of page

पीएम आवास योजना 2.0, सरकार पुन्हा लाखो कुटुंबांना पक्के घरे देणार!


आजच्या काळात, स्वत:चे घर असणे ही केवळ गरज नाही तर प्रत्येक कुटुंबाचे सर्वात मोठे स्वप्न आहे. वाढते भाडे, महागडी जमीन आणि मर्यादित उत्पन्न यामध्ये हे स्वप्न अनेकदा अपूर्ण राहते. परंतु आता सरकारचा नवीन उपक्रम हे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा करत आहे. ‘ प्रधानमंत्री आवास योजना 2.0 द्वारे जानेवारी 2025 पासून लाखो कुटुंबांना पक्के घरे देण्याची तयारी करण्यात आली आहे.


या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांना घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी सोपे कर्ज, व्याज अनुदान आणि सोपी अर्ज प्रक्रिया यांचा लाभ दिला जात आहे. जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजना 2.0 द्वारे, सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी मदत करत आहे.


ही योजना विशेषत: ज्यांना त्यांचे पहिले घर खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत, जास्तीत जास्त 1.80 लाख व्याज अनुदान उपलब्ध आहे. हे अनुदान 8 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 4% दराने लागू असेल. ही रक्कम थेट कर्ज खात्यात पाच वार्षिक हप्त्यांमध्ये पाठवली जाते.


अशी आहे अर्ज प्रक्रिया: गरजुंना योजनेचा सहज लाभ मिळावा यासाठी सरकारने अर्ज प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे, लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येत आहे, शहरी संस्था कार्यालय, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) किंवा अधिकृत बँक शाखेतून फॉर्म भरू शकतात .


आवश्यक कागदपत्रे: अर्ज करण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे ज्यामध्ये आधार कार्ड, ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदार ओळपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स), पत्याचा पुरावा ( वीज किंवा पाण्याचे बिल, मतदार ओळपत्र), उत्पन्नाचा पुरावा ( बँक स्टेंटमेंट, आयटीआर, फॉर्म 16)) मालमत्तेची कागदपत्रे, बँक खात्याची माहिती, प्रतिज्ञापत्र: कायमस्वरुपी घर नसल्याचा दाखला या कागदपत्रांची अवश्यकता आहे.

Comments


bottom of page