पुणे विषारी दारुकांडातील आरोपींवर फुगेवाडीकराचा हल्ल्याचा प्रयत्न सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला
- Navnath Yewale
- Jun 1
- 1 min read

पुणे: पुण्यातील पिंपरी- चिंचवड फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे 18 हून अधकि जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 22 हून अधिक अधिकारी, कर्मचार्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आज या प्रकरणातील आरोपींना सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणले तेव्हा संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.
फुगेवाडी येथील विषारी दारुकांडात 18 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही विषारी दारु वितरण करणार मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह राधेश्याम प्रजापती, कर्नल किरका सिंग आणि गुरु मंगल सिंग या चार आरोपींना पिंपरी न्यायालयाने 8 जूनपयर्र्ंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींना तपासासाठी आज घटनास्थळी फुगेवाडीत आणण्यात आले होते. या वेळी आरोपींना पाहून परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
फुगेवाडी विषारी दारुकांड प्रकरणातील अरोपींना तपासासाठी घटनास्थळी आणल्यानंतर फुगेवाडीतील स्थानिक आणि पीडीत मृतांचे नातेवाईक संतप्त झाले. सीआयडीच्या पथकाने पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी येथे गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला. यानंतर तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेत असताना संतप्त नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.
दरम्याना यावेळी काही नागरिकांनी अरोपींच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. एका ज्येष्ठ महिलेने आरोपींपर्यंत पाहोचण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडताच सीआयडी पथकाने आणि पोलिसांनी तातडीने वेळीच हस्तक्षेप केला. पोलिसांच्या पथकाने लागलीच आरोपींभोवती सुरक्षा कवच निर्माण करत जमावाला रोखले. काही तरुणांनी दगड उचलून मारण्याचा देखील प्रयत्न केला. वाढता रोष लक्षात घेऊन आरोपींना तातडीने वाहनातून रवाना करण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला असला, तरी विषारी दारुकांडानंतर फुगेवाडीत संतापाची लाट कायम आहे.


Comments