top of page

पुण्याच्या डिआरआयची सातार्‍याच्या पाचपुतेवाडीत छापेमारी 6 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त! , सातार्‍यात खळबळ

सातारा: पुणे येथील डीआरआय पथकाने आज सातार्‍याच्या कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे छापा टाकला आहे. एनडीपीएस कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून ड्रग्जवर मोठी कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर 2025 मध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केलं होतं, डीआरआय विभागनं आज केलेल्या कारवाईबाबत सातारा पोलिसही अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.


कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या डीआरआय (डायरेक्ट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स) विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने कराड ड्रग्ज प्रकरण समोर आलं आहे. या ठिकाणाहून किमान 6 हजार कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमध्ये तीन आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश होता.


दरम्यान, महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती आहे. या कारवराईत बाबा मोरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पथकाने एक सेड सील केले आहे. या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केलं जात असल्याची सातारा जिल्ह्यात दबक्या आवाजत चर्चा आहे.



विशेष म्हणजे सातारा पोलिस या कारवाई बाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या ठिकाणी नक्की कोणतं आम्ली पदार्थ तयार केलं जात होतं आणि आणखी किती जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे याची माहिती समोर येऊ शकली नाही. डीआरआयच्या खुलाशानंतरच कारवाईची सखोल माहिती समोर येणार आहे.

Comments


bottom of page