पुण्यात काका-पुतण्यात साखरगोडवा; साखर संकुलात बैठक
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

पुण्यातील साखर संकुलामध्ये उस लागवड प्रक्रियेत कृत्रीमबुद्धिमत्तेच्या वापरासाठी बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले. याप्रसंगी काका-पुतण्यात हास्यविनोद पहायला मिळाले. दोन पवार वारंवार एका मंचावर येत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा चर्चेला खतपाणी मिळत आहे. या बैठकीत वसंतदादा शुगर आणि बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थामध्ये उस पिकांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा करार करण्यात आला. यावेळी व्हीएसआयचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, व्हीएसआय चे महासंचालक संभाजी कडू पाटील उपस्थित होते.
उस पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वावर वाढविण्याच्या उद्देशान या वेळी सादरिकरण करण्यात आले. दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ऊस शेतीमध्ये ‘एआय’द्वारे काय प्रयोग करता येतील. यादृष्टीने चर्चा करण्यात आली. दरम्यान ऊसशेतीमधील ‘एआय’ प्रयोगाच्या चर्चेच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार मागील महिन्यात अशाच बैठकीत एकत्र आले होते. ‘एआय’ च्या आधारे कृषी विभाग कोणती पावले उचलत आहे. याबाबत शरद पवार यांनी आस्थेने माहिती जाणून घेतली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनंतर काका- पुतणे एका व्यासपीठावर आल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत.
मांजरा येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेसह व्यवस्थापन बैठकीसाठी दोघे एकत्र आले होते. मध्यंतरी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत दोघांचा संवादही अनेकांनी अनुभवला होता. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुडा कार्यक्रम पवार कुटुंब एकत्र आले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली याबाबत सुप्रिया आणि अजित निर्णय घेतील , अशी गुगली टाकून पवार यांनी मध्यंतरी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. याबाबत त्यांना पुन्हा विचारले असता कल्पना नाही, असे सांगून त्यांनी विषय टाळला. अजित पवार यांनीही अशी कोणतीही चचाृ नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांना रविवारी याबाबत पत्रकांरानी विचारले असताना ते न बोलता निघून गेले.
दरम्यान, शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिन बालेवाडी येथे 10 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याआधी नऊ जून रोजी ‘व्हीएसआय’ च्या बैठकीसाठी देान्ही पवार पुन्हा एकत्र येणार आहेत. दरम्यान, साखरेच्या गोडव्यासाठी काका-पुतण्यातील गट्टीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चेर्चेला वाव मिळत आहे.
Comments