top of page

पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर; चांगूर बाबा झाला शंभर कोटींचा मालक

रसत्यावर आंगठ्या बनवणारा जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा तपास यंत्रणांच्या कचाट्यात

ree

बेकायदेशीर धर्मांतराच्या आरोपखाली यूपी एटीएस पथकाने जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबाला अटक केली. आतापर्यंत या प्रकारणाची चौकशी यूपी एटीएस आणि एसटीएफ करत होते. परंतु आता अंमलबजावणी संचालनालयाने देखील या प्रकरणात प्रवेश केला आहे. चांगूर बाबाला यूपीमधून अटक करण्यात आली. न्यायालयाने जमालुद्दीनविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते, तर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी 50,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.


जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा जो यूपी (उत्तरप्रदेश) चा रहिवासी आहे, तो काही वर्षापूर्वीपर्यंत रस्त्यावर अंगठ्या आणि बनावट रत्ने विकायचा. त्यानंतर, त्याला परदेशातून निधी मिळू लागला असा आरोप आहे. त्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. अवघ्या 5-6 वर्षात तो एका आलिशान हवेली, आलिशान गाड्या आणि अनेक बनावट संस्थांचा मालक बनला. माधपूर गावातील हवेली त्याच्या नेटवर्कचा मुख्य आधार होता. जिथून त्याचे संपूर्ण नेटवर्क चालवले जात असे. अहवालानुसार, गावकर्‍यांनी सांगितले की, चांगूर बाबाचे सुमारे दहा प्रमुख जवळचे सहकारी या हवलीला भेट देत असत.


दरम्यान, युपीतील बलरामपूर येथील माधपूर गावातील चांद औलिया दर्ग्याशेजारी राहणारा चांगूर बाबा हा केवळ बाबा नव्हता तर संपूर्ण नेटवर्कचा प्रमुख होता. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. चांगूर बाबाविरुद्ध एटीएसला ठोस पुरावे मिळाले आहेत की, त्यानेबेकायदेशीर धर्मांतराद्वारे 100 कोटींहून अधिक रुपये जमा केले आहेत. चांगूर बाबा आणि त्याच्या संस्थांशी जोडलेल्या खात्यांमध्ये 100 कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. एटीएसने पुढे सांगितले की, तो या पैशाचा वापर अनेक ठिाकणी दहशतवादी निधी आणि बेकायदेशीर धर्मांतरासाठी करत होता. आता एटीएस चांगूर बाबाबद्दल सविस्तर अहवाल तयार करेल आणि तो ईडीला देईल, जेणेकरून त्याच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येईल आणि पैशाचा माग काढता येईल.


लोक जाळ्यात आडकले कसे?:

चांगूर बाबा टोळी ही एक सामान्य टोळी नव्हती तर एक सुविचारित कट रचला गेला होता, ज्या अंतर्गत सर्व काम केले जात होते. हे कट रचण्यासाठी, गरीब, कामगार, असहाय्य लोकांना आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्याचे लक्ष्य केले जात होते आणि जर ते सहमत झाले नाहीत तर त्यांच्यावर पोलिस स्टेशन आणि कोर्टाद्वारे खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ केला जात होता.


या प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे धर्मांतरासाठी सर्व जातींचा दर निश्चित करण्यात आला होता. इतकेच नाही तर वेगवेगळ्या जातींच्या मुली आणण्यासाइी लाखोंचे दर निश्चित करण्यात आले होते. ब्राम्हण, सरदार आणि क्षत्रिय मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी 15 ते 16 लाख रुपये देण्यात आले होते. मागास जातीच्या मुलीला पैशाचे आमिष दाखवण्यात आले आणि नंतर तिला 10 ते 12 लाख रुपये आणि इतर जातींच्या मुलींना 8 ते 10 लाख रुपये देण्यात आले.


आरोपींच्या शोधात पथके:

एटीएस आणि एसटीएफ पथके चांगूर बाबाच्या नेटवर्कच्या 14 मुख्य साथीदारांचा शोध घेत आहेत. यामध्ये कथित पत्रकार आणि इतर प्रसिद्ध चेहरे समाविष्ठ आहेत. ज्यांची नावे शोधली जात आहेत त्यात मेहबूब, पिंकी हरिजन, हाजिरा शंकर, पैमन रिझवी (कथित पत्रकार) आणि सगीर यांचा समावेश आहे. त्यांच्या अटकेमुळे टोळीच्या नेटवर्कची आणखी खोलवरची गुपिते उलगडू शकतात. टोळीतील अनेक सदस्य आझमगड, औरेया, सिद्धार्थनगर सारख्या जिल्ह्यांतील आहेत आणि त्यांच्याविरुद्ध आधीच एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


माधपूरमध्ये आलिशान हवेली बांधल्यानंतर जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा याने या हवेलीच्या त्याच परिसरात पदवी महाविद्यालय उघडण्याची योजना आखली होती. तयसाठी त्याने हवेलीचे बांधकामही सुरू केले होते. सध्या अटकेनंतर त्याच्या योजना आता गुंडाळल्या आहेत.


दरम्यान, गुरुवारी 12 लोकांना लखनऊमधील त्यांच्या घरी परत आणण्यात आले. या लोकांनी इस्लाममधून हिंदू धर्म स्वीकारला. त्यापैकी काहींना लव्ह जिहादमध्ये आणून, काहींना धमकी देऊन आणि काहींना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आले. काल लाखनौमध्ये एका हिंदू संघटनेने इस्लाममधून हिंदू धर्मात धर्मांतर केलेल्यांमध्ये मांडवी शर्मा, मालती, एलेना अन्सारी आणि सोनू राणी यांचा समावेश आहे. या लोकांनी माध्यमांसमोर चांगूर बाबाचा उल्लेख केला आणि तो लोकांना लव्ह जिहादमध्ये कसे आमिष दाखवून धर्मांतरित करायचा हे सांगितले.


या प्रकरणावर दोन एजन्सी करणार काम :

लखनौ पोलिसांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा आणि सहआरोपी नीतू उर्फ नसरीन आणि इतर दोन आरोपी नवीन उर्फ जमालुद्दीन आणि मेहबूब (जलालुद्दीनचा मुलगा) यांना 8 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. हे दोघेही सध्या लखनौ जिल्हा तुरुंगात आहेत. या प्रकरणात चांगूर बाबाला रिमांडवर घेताना एनआयएचे अधिकारी त्यांचीही चौकशी करतील. खरं तर, चांगूर बाबाच्या अटकेनंतर केंद्रीय तपास संस्था देखील सतर्क झाल्या आहेत आणि नेपाळ सीमेवर सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतराच्या या रॅकेटचा तपास करत आहेत. यावेळी एनआयएचे अधिकारी यूपी एटीएससोबत या प्रकरणात काम करत आहेत.

Comments


bottom of page