प्रशासनाला प्रलंबीत कामांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन शिरुरमध्ये शेतकर्यांची अडवणूक खपवून घेणार नाही; आमदार धसांची यंत्रणेला तंबी
- Navnath Yewale
- Dec 24, 2025
- 2 min read

बीड : तालुक्यात मोजणीचे 200 ते 250 प्रकरणं प्रलंबीत राहणं ही दुर्दैवाची बाब आहे. सिंदफणा मध्यमप्रकल्पाच्या उंची वाढवण्यासाठी 123 हेक्टरच्या मोजणीचे काम रखडले आहे. प्रशासनस्तरावर शेतकर्यांची तसूभरही अडवणूक खपवू घेणार नसल्याची तंबी देत आमदार सुरेश धस यांनी प्रलंबीत कामे मार्गी लावण्यासाठी 31 जानेवारीची मुदत दिली आहे.
तालुक्यातील रस्ते, सिंचन, विज, महसूल आदी विभागांतर्गत कुशल, प्रगतीपथावरील, नियोजीत कामांचा आढावा आमदार सुरेश धस यांनी बुधवारी 23 तहसील कार्यालयात घेतला. प्रशासकीय आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार प्रभाकर घोळवे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टीचे कार्यकारी अभियंता कृष्णाथ पानसंबळ, गटविकास अधिकारी श्री नागरे, कृषि अधिकारी श्री गांगर्डे, गटशिक्षणाधिकारी श्री. शिंदे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी रेशन दुकानदारांच्या तक्रारींचा पाढाच वाचला, मात्र, रेशन दुकानदारांच्या बाबतीत तक्रारींवर स्वतंत्र बैठक घेवून कारभारत सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी आमदार धस यांनी तहसीलदार घोळवे यांना दिल्या. दरम्यान, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विज रोहित्री, खांब, ट्रान्सफार्मर आदी सामग्री खरेदी, विक्रीसह कामांची स्थिती आमदार धस यांनी जाणून घेतली. शेतकर्यांना विज वितरण कंपणीच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शनाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
तालुक्यात शेत रस्ते, वस्ती रस्ते मोकळे करून देणे, हद्द कायम करणे यासंबंधी येणार्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सिंदफणा, मदमापूरी, उखळवाडी, जाधववाडी, प्रकल्पांतील भूसंपादन व मावेजा प्रकरणाचा आढावा घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थिती जबाबदार प्रशासनाच्या अधिकार्यांना दिल्या. गेल्या एक तपापासून प्रलंबीत सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढवून उजव्या व डाव्या कालावा कार्यान्वीत करून शेतकर्यांना वेळेत सिंचन उपलब्धतेसाठी तातडीने देखभाल दूरुस्तीच्या कामाच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना आदेशीत केले.
यावेळी नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर, नगरपंचयातीचे मुख्याधिकारी गणेश दहिफळे, तालुकाध्यक्ष सुरेश उगलमुगले, पोलिस निरिक्षक प्रविण जाधव यांच्यासह प्रशासनातील तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बोलघेवड्याची कान टोचले: कामात दिरंगाई करणार्या प्रशासनातील अधिकारी कर्मचार्यांच्या कर्तव्याकडे बोट दाखवत लेखी तक्रारी ऐवजी केवळ बैठकांमध्ये तक्रारींचे काव्य करणार्या बोलघेवड्याचे आमदार धस यांनी चांगलेच कान टोचले.



Comments