top of page

प्रियकराकडून लग्नाचा तगादा; जामखेडच्या कलाकेंद्रातील नृत्यांगनेची लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या


आहिल्यानगर: कलाकेंद्रावरील नृत्यांगना मैत्रिनींना बाहेर जाते म्हणून सांगूगेलेल्या नृत्यांगनाने शहरातील लॉजमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.4) घडली.


कलाकेंद्रातील नृत्यांगनेच्या नादापाई धाराशिवमध्ये एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. गेवराईच्या गोविंद बर्गे यांनी नृत्यांगनेच्या घरासमोर स्वत:च्या चारचाकी गाडीमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यापूर्वी घडला होता. तसाच काहीसा प्रकार जामखेड (जि. आहिल्यानगर) येथे गुरुवारी (दि.4) घडला आहे.


शहराच्या एका कलाकेंद्रामधील नृत्यांगना दिपाली पाटील वय (35 वर्षे) रा. कल्याण मुंबई हल्ली मुक्काम तपनेश्वर रोड,जामखेड. कलाकेंद्रातील नृत्यांगना दिपाली पाटील हि एकटीच जामखेड येथे राहत होती. गुरूवारी दिपाली पाटील मैत्रिणींना बाजारात जाते असे सांगून घराबाहेर पडली ति परत आलीच नाही. बराच वेळ उलटूनही दिपाली परतली नसल्याने तिच्या मैत्रिणींनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून दिपालीचा शोध सुरू केला. दिपाली ज्या रिक्षाने बाहेर गेली त्या रिक्षावाल्यास पोलिसांनी गाठले असता त्याने खर्डा रोडवरील हॉटेल साई लॉज याठिकाणी दिपलीस सोडल्याचे सांगितले.


माहितीनुसार पोलिसांनी सायंकाळी खर्डा रोडवरील हॉटेल साई लॉज गाठले. लॉजमध्ये एक रुम दिपालीच्या नावे असल्याचे अढळून आले. पोलिसांनी दिपालीच्या रुमचा दरवाजा वाजवला मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्याने येथील कामगाराकडील दुसर्‍या चावीने रुमचा दरवाजा उघडला असता दिपालीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी जामखेड रुग्णालयात पाठवले. दिपालीची आई दुर्गाबाई गायकवाड (रा. कल्याण) यांना पोलिसांनी बोलावून घेतले. जामखेडच्या शासकीय रुग्णालयात दिपालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


दुर्गाबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून दिपाली हीस भाजपचा नगरसेवक संदीप गायकवाड (रा.जामखेड) याने लग्नाचा तगादा लावत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. त्यानुसार जामखेड पोलिसात आरोपीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जामखेड पोलिस पुढील तपास करत आहेत.


दरम्यान, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दिपाली पाटील हिच्या सोबत लॉज वर कोण होतं, या प्रकरणी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, कोणत्या उच्चस्पदाचा यास पाठिंबा आहे असे अनेक प्रश्न उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी घटनेची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

Comments


bottom of page