फणस पाडा - भोवर दाचापाडा नदीवरील पूल पाण्याखाली
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read
पूर्णपणे वाहतूक ठप्प; निरुंद आणि ठेंगण्या पूलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

जव्हार: तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत भोवरदाचा पाडा - फणस पाडा रस्त्यावर ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या कमी उंचीच्या पुलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हा पूल पुराच्या पानाखाली जाऊन अनेक गाव पाड्यातील ग्रामस्थांचा संपर्क तुटतो. काळशेती नदीवर पूल बांधावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केशव टोकरे तसेच पत्रकार सोमनाथ टोकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडे एक वर्षांपूर्वी तसेच आमदार -खासदार -तीन चार पालघर पालकमंत्री जनता दरबारामध्ये निवेदन देऊन तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन पुलासाठी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम फक्त आश्वासन देत आहे नक्की ठोस पाऊल कधी घेणार याकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत.भोवर दाचा पाडा, फणस पाडा मोख्या चापाडा, भगत पाडा कुंभार खांड, या गावाची सुमारे २ हजार आसपास लोकसंख्या असलेल्या गावातील लोकांना पावसाळ्यात या अरुंद पुलाचा शालेय विद्यार्थी, शेतकरी, नोकरवर्ग, रोजगारासाठी तालुक्याच्या ठिकाणी, सरकारी कामानिमित्त, किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खोळंबा होतो , त्यातच शेतकरी व रुग्णांना हॉस्पिटला जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने मोठी अडचणी समृद्ध जावे लागते .
भोवर दाचापाडा त्याचा पण आहे फणस पाडा ते भोवर चापाडा रस्त्यावरील काळशेती नदीवर मोठया उचीचा कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी केशव टोकरे तसेच जनता वारंवार शासनाकडे नवीन पुला साठी मागणी करीत आहे.

जव्हार तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत मधील फणस फाटा ते भोवर दाचापाडा काळशेती नदीवरील महत्त्वाचा या पुलावरून मोठया प्रमाणात वाहणाचा पुला वरून ये -जा होत असतात. त्यामुळे सरकारने या पुलाकडे गांभीर्य लक्ष देऊन येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम या भागातील ग्रामस्थ बांधकाम विभागाला घेराव घालतील.
केशव टोकरे माजी ग्रामपंचायत सदस्य कौलाळे..
Comments