फरार मनोरमा खेडकरला अटकेतून तात्पुरता दिलासा; अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
- Navnath Yewale
- Oct 1
- 1 min read

ट्रकमधील व्यक्तीचं अपहरण करून घरात डांबून ठेवणार्या मनोरमा खेडकरला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मनोरमा खेडकर अपहरण प्रकरणापासून फरार आहे. तिने बेलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनोरमा खेडकरला 13 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणीत यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे.
13 सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रकचा मनोरमा खेडकर यांच्या लॅण्ड क्रूझर गाडीला धक्का बसला होता. या अपघातानंतर खेडकरने ट्रकमधील प्रल्हाद चौहान याला जबरदस्ती कारमध्ये बसवले.
मनोरमा खेडकर त्या व्यक्तीला पुण्यातील बावधन येथील बंगल्यावर घेऊन गेली. तिथे त्याला डांबून ठेवले होते. रबाळे पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार आली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मनोरमा खेडकरच्या घरातून पोलिसांनी प्रल्हाद चौहानला सोडवले.
पोलिसांनी अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकरला नोटीस बजावली होती. पण, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर मनोरमा खेडकर, तिच्या पती दिलीप खेडकर आणि त्यांचा सुरक्षा रक्षक फरार झाले. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसह काढण्यात आली होती.
दरम्यान, मनोरमा खेडकरने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मंगळवारी न्यायालयाने मनोरमा खेडकरला अंतरिम जामीन मंजूर केला.


Comments