top of page

बारामतीत पुन्हा विमान कोसळलं; गोजुबावीत शिकाऊ विमान स्कॅ्रच शिकाऊ वैमानिक सुरक्षीत

बारामती : बारामती विमानतळावर गोजुबावी गावशिवारात अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आज बुधवारी (दि.13) गोजुबावी गाच्या हद्दीत पुन्हा विमान दुर्घना झाली आहे. सकाळी 9:30 च्या सुमारास गोजुबावी शिवारात एक शिकाऊ विमान कोसळलं. अपघातानंतर विमानाचे नुकसान झाले असून वृैमानिक सुरक्षीत असल्याची माहिती आहे.


गोजुुबावी नजीक दुधेवस्ती येथे शिकाऊ विमान कोसळले. हे विमान श्रीपल नावाचा शिकाऊ वैमानिक एकटाच चालवत असल्याची माहिती आहे.आटोळी वस्तीवर रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातचे नेमके कारण समजू शकले नाही. यातील वैमानिकांना सुदैवाने कोणतीही मोठी इजा झाली नसल्याची माहिती आहे.


टेकनम व्हीटी आरएफआय जातीचे हे शिकाऊ विमान असून या विमानात दोन वैमानिक बसू शकतात. विमान धावट्टीवर उतरताना हा अपघात झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असून यात विमानाचेही नुकसान झाले आहे.


सुदैवाने वैमानिक सुखरुप आहे. या बाबत रेबर्ड कंपनीचे अधिकारी तसेच पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादाव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बारामती एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनीही घटनास्थळी घाव घेतली होती. अपघातानंतर रेडबर्ड कंपनीच्या प्रशासनाकडून लगेचच कपडे घालून विमान झाकण्याचा प्रयत्न केला गेला. कंपनीकडून या बाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.


अपघाताची परंपरा : बारामतीत रेडबर्ड कंपनीने वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु केल्यानंतर अनेकदा त्यांच्या विमानाचे विविध कारणांनी अपघात झालेले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये तसेच त्या नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये चार दिवसांच्या अंतराने दोन अपघात आणि पुन्हा ऑगस्ट 2025 मध्येही अपघाताची नोंद आहे. जवळपास चार अपघाताची नोंद असून डीजीसीए यांनी या कंपनीवर यसा पूर्वीही उड्डाण करण्यास बंदी घातलेली होती.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर बारामती विमानतळावर विमानांना उतरण्यास बंदी घालण्यात आल्याने सगळे व्हीआयपी हेलिकॉप्टरमधूनच बारामतीत उतरत आहेत. या विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बाबत उपाय योजना होण्याची पुन्हा एकदा मागणी होत आहे.

Comments


bottom of page