top of page

बीड पुन्हा हादरलं; सरकारी वकिलाची न्यायालयात गळफास घेवून आत्महत्या



बीड, मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड कायम चर्चेत राहिलं आहे. आज बीड जिल्ह्यातील वडवणी येथी प्रथमसत्र न्यायालयात एका सरकारी वकिलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयातच सरकारी वकिलाने आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.


वडवणी (जि.बीड) येथील स्थानिक न्यायालयामध्ये सरकारी वकिल विनायक चंडेल यांनी खिडकीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी प्रेत शासकिय रुग्णालयात पाठवले आहे.


दरम्यान, विनायक चंडेल यांनी आत्महत्ये सारखं टोकाचं पाउल का उचललं याचे कारण समजू शकले नाही. एका सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारात गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वडवणी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Comments


bottom of page