top of page

जुन्नरच्या पिंपळवंडीत नसरापुर घटनेची पुनर्रावृत्ती; नऊ वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करून खून पेरू देतो म्हणून शेतात नेलं, 24 वर्षीय नराधम आरोपी पोलिसाच्या ताब्यात

Aug 19
2 min read

पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातएका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी धरण परिसरातील गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हारदला आहे. आजारी असल्यामुळे शाळेत न गेलेली साडे नऊ वर्षाची मुलगी दुपारी घरी टीव्ही पाहत होती. याचेवळी तिच्या ओळचीचा, शेजारी रहाणारा 24 वर्षीय तरुण तिच्याकडे आला आणि पेरूच्या बागेत घेऊन जाण्याचे अमिष दखवले. त्यानंतर घडलेल्या घटनांचा तपास पोलिसांनी सीसीटीव्ही आणि चौकशीच्या आधारे उलगडला.


घटनेच्या दिवशी मुलीची तब्येत ठीक नव्हती. व्हारयल इन्फेक्शन झाल्यामुळे ती शाळेत गेली नव्हती. तिचे आई- वडिल रोजंदारीच्या कामासाठी सकाळी घराबाहेर गेले होते. त्यामुळे दुपारच्या वेळी मुलगी घरी एकटीच होती आणि टिव्ही पाहत होती. दुपारी साधारण तीन ते साडे तीनच्या सुमारास तिच्या घरासमोर 24 वर्षीय तरुण तिच्याकडे आला. पीडित मुलगी त्यास आधीपासूनच ओळखत होती. दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या परिचयाची असल्याने त्याच्यावर मुलीचा विश्वास असण्याची शक्यता होती. या नराधमाने मुलीला पेरूच्या बागेत चल, तुला पेरू काढून देतो, असे सांगितले. त्यानंतर तो तिला सायकलवर बसवून घेऊन गेला. संध्याकाळी आई-वडिल घरी आले अन् मुलगी गायब असल्याचं लक्षात आलं. दरम्यान, त्यानंतर काही वेळाने तो नराधम परतला. मात्र मुलगी त्याच्यासोबत नव्हती. संध्याकाळी आई- वडील कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिचा शोध सुरू करण्यात आल. कुटुंबीयांनी गावात आणि परिसरात चौकशी केली. मात्र तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर पोलिसांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.


पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गावाती विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. गावातील मुख्य भागातील तसेच रस्त्यालगतच्या दुकानांवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासण्यात आले. या प्रक्रियेत एक महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला. ज्यामध्ये तो नराधम सायकलवरून जाताना आणि त्याच्या मागे एक मुलगी बसलेली असल्याचे दिसून आले. हाती आलेल्या फुटेजवरून पोलिसांनी त्या नराधमाची ओळख पटवली. विशेष म्हणजे मुलीचा शेाध घेत असताना तो नराधम इतर गावकर्‍यांसोबत शोधमोहिमेत सहभागी असल्याचे सांगण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या नराधमाची चौकशी केली. त्याने मुलगी काही काळ आपल्या सोबत असल्याचे मान्य केले. मात्र, त्यानंतर तिला पेरूच्या बागेत सोडल्याचा दावा त्याने केला.


मुलगी नेमकी कुठे आणि कधी वेगळी झाली, याबाबत त्याच्या उत्तरामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौेकशी दरम्यान पोलिसांनी त्यास घटनास्थळाच्या दिशेने नेले. गावच्या रस्त्याच्या पुढील बाजूस असलेल्या उसाच्या शेतात तपास केला असता मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी आरोपीला तब्यात घेतले.


पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालनात धक्कादायक बाब समोर आली. प्राथमिूक माहितीनुसार तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झालेल्या श्वासरोधामुळे झाल्याचे अहवालातून समोर आले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचा झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले. तपासातील माहितीनुसार मुलीने आरडा ओरड करू नये किंवा घटनेची माहिती कोणाला मिळू नये, या उद्देशाने आधी तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिच्यावर अतयचार करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक् करण्यात आला आहे. या घटनेने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.


नराधम आरोपीच्या पूर्वीच्या वर्तनाबात गावातील काही महिलांनी पोलिसांना माहिती दिली आहे. काही महिलांच्या म्हणण्यानुसार तो त्यांचा पाठलाग करत असे. तसेच महिलांच्या खासगीपणावर अतिक्रमण करणारे प्रकार केल्याचेही आरोप आहेत. काही ठिकाणी महिलांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांण्यात येत आहे.


पोलिसांच्या चौकशी मध्ये नराधम आरोपीने आपल्या वैयक्तिक आणि लैंगिक इच्छांबाबत काही कारणे सांगितल्याची माहिती आहे. मात्र, कोणतेही वैयक्तिक कारण किंवा मानसिक अवस्था गंभीर गुन्ह्याचे समर्थन ठरू शकत नाही. आरोपविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आलेली नसली,त री त्याच्या .पूर्वीच्या वर्तनाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, जुन्नर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या या प्रकरणात आरेापीला कठोर शिक्षा व्हावी.अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Comments


bottom of page