बीड हादरलं: रायमोहात दगडाने ठेचून तरुणाचा खून पेंटींग काम करणार्या तरुणाची निर्घुन हत्या, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

बीड : डोके दगडाने ठेचून युवकाचा निर्घुन खून केल्याची घटना रायमोहा (ता. शिरुर कासार) येथे सोमवारी (दि.2) उघडकीस आली. चांद अल्हाहुद्दीन तांबोळी वय 30 वर्षे रा. रायमोहा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेंटीग व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. पाटोदा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायमोहा येथील चांद अल्हाहुद्दीन तांबोळी हा पेंटींग व्यवसाय करत होता. रविवारी (दि.1 फेब्रूवारी) सकाळी बीडला जातो म्हणून तो मालकीच्या मोटारसायकल वरुन बीडला गेला. सायंकाळी बीडहून परत घरी आल्यानंतर कामानिमीत्त निरगुडी (ता. पाटोदा) येथे जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला. नातेवाईकांनी रात्री मोबाईलवरुन संपर्क केला असता मी हिवरसींगा येथे आलो असल्याचे सांगितले.
मात्र रात्री 7:45 वाजता खोकरमोहा (ता. शिरुर कासार) शिवारातील वाल्मिक मिसाळ यांचे हॉटेल येथे गाडी लावली आहे ती घरी घेवून जाण्यास नातेवाईकास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी वारंवार त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. अशी फिर्याद खलील अल्हाहूद्दीन तांबोळी (वय 54 वर्षे) यांनी शिरुर कासार पोलिस ठाण्यात पहाटे 3:58 वाजता दिली.
नातेवाईकांनी पाहूण्यांसह मित्रांकडे चांदचा शोध घेतला पण तो कुठेच मिळून आला नाही, चांद कोठेच मिळून येत नसल्याने नातेवाईकांनी पहाटे शिरुर कासार पोलिस ठाणे गाठून मिसिंगची फिर्याद दिली. त्यानंतर सकाळी रायमोहा शिवारात राजूरी नवगन- चिंचपूर मार्गाच्या बाजूला डोंगरदेवी संस्थाच्या जवळ खड्यात एक व्यक्ती पडल्याच्या माहितीवरुन पाटोदा पोलिस (रायमोहा चौकी) घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी चांदच्या नातेवाइकांशी संपर्क करून अढळून आलेली व्यक्ती चांद असल्याची खात्री केली.
दरम्यान, युवकाच्या डोक्याला मागील बाजूस मोठी जखम अढळून आली. मयताचे कपडे पूर्णत: रक्ताने माखलेले होते. चांदचा इतर कुठेतरी खून करून त्याचे प्रेत येथे फेकून दिल्याचे प्रत्यर्शी दिसून आले. महामार्गापासून ते खड्ड्यापर्यंत फरफटत नेल्याचे व्रण जमिनीवर दिसून आले. माणसीक विकृतीने चांदचा अत्यंत निर्घुनपणे खून करून प्रेत महामार्गाच्या बाजूला दगडाच्या आडूशाला फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रायमोहाच्या ग्रामीण रुग्नालयात शवविच्छेदन करून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशीरा पर्यंत पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



Comments