बैठकीपूर्वीच ओबीसी संघटनात गटबाजी वादंग!
- Navnath Yewale
- Oct 4
- 2 min read
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आज ओबीसी नेत्यांची बैठक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ गैरहाजर रहाणार

हैदराबाद गॅझेटिअर च्या जीआर विरोधात भूमिका घेणार्या ओबीसी संघटना, नेत्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र, बैठकीपूर्वीच ओबीसी संघटनातील वादंग समोर आले आहे.
मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षणासाठी सरकारने 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. हैदराबाद गॅझेटिअरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके यांच्यासह अगदी काल परवा दसरा मेळाव्यात मुंडे बंधु-भगिणींनेही ओबीसीतून मराठा आरक्षणास विरोध केला. नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी महामार्चाच्या माध्यमतून हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी मोर्चाचा इशरा दिला. मंत्री छगन भुजबळ यांनीही समता परिषदेच्या माध्यमातून बीड मध्ये 28 सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन केले होते, पण अतिवृष्टीमुळे ते पुढे ढकलण्यात आले तसी भुजबळ यांनी माहिती दिली. लक्ष्मण हाके मराठा आरक्षणाला विरोध करताना जरांगे पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.
दरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठी जरांगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू असतानाच इकडे ओबीसी महासंघाच्या वतिने नागपूरमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी उपोषण सुरू करण्या आले होते. सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढल्या नंतर मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने ओबीसी महासंघाच्या आंदोनास भेट देवून जीआर मधील सर्व बारकावे आंदोलनकर्त्यांसमोर मांडले. शिवाय आंदोलनकर्त्यांच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटिअर बाबत गैरसमज दूर केला. त्यामुळे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच पितृसत्ताक पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत त्यात काही नविन नाही तसा सर्वांसाठी समान कायदाच आहे. सरकारच्या जीआर मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही या मतावर ठाम राहून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत हैदराबाद गॅझेटिअर रद्द करण्याची मागणी करणार्या ओबीसी नेत्यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली आहे. या बैठकीस ओबीसी उपसमितीमधील सर्व पदाधिकारी, मंत्री छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, यांच्या पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लक्ष्मण हाकेंना निमंत्रण नाही: मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये समता परिषदेच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. तांत्रीक अडचणीमुळे मेळावा पुढे ढकण्यात आला. मात्र या मेळाव्याच्या बॅनवरून लक्ष्मण हाके यांना डिच्चू देण्यात आला होता. त्यामुळे हाके यांनी चक्क चळवळीतून बाहेर पडण्याचा इशारा देत नाराजी व्यक्त केली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीचेही हाके यांना टाळण्यात आलं आहे.



Comments