भल्या-भल्यांना नाही जमलं, ते एका मुख्याधिकार्यांनी केलं अखेर शिरुर नगरपंचायतीचे अतिक्रमणावर बुडलडोझर; टप्प्या-टप्प्याने शहराचा श्वास मोकळा करणार!
- Navnath Yewale
- Jan 16
- 2 min read

बीड: शिरुर शहराच्या अतिक्रमणाचा विषय एवढा गंभीर होता की, भल्या,भल्यांनी अतिक्रमणाच्या कारवाईपुढे नांग्या टाकल्या. शहर विस्तारीकरणाच्या नावाखाली बाजारपेठेलाच पाय फुटले मात्र, कारवाईला कोणी धजावले नाही. मात्र, निर्भिड, निष्पक्ष, कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून लाभलेले नगरपंचायतीचे नायब तहसीलदार तथा सीओ गणेश दहिफळे यांनी कायद्यापुढे सर्व समान या न्यायाने शहरातील संभाजी चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवले.
शिरुर कासार शहराची बाजारपेठ तालुक्यासाठीच नव्हे तर परजिल्ह्यातही नावाजलेली आहे. जामखेड (जि. आहिल्यानगर), बोधेगाव (ता. शेवगाव) हिरापूर (जि.बीड) या बैलबाजारांच्या ठिकाणापासून अगदी मध्यावर असलेला शिरुरचा बैल बाजार एकेकाळी प्रसिद्ध होता. त्याच बरोबर येथील कापड, किराणा, आडतीची बाजारपेठ लौकीक होती, आजही त्या प्रमाणात आहे. कालांतरारणे येथील बैलबाजार बंद झाला, तो शिरुरकारांसाठी आत्मचिंतणाचा विषय म्हणावा लागेल. शहरं वाढतात तसी बाजारपेठाचही विस्तार होते. तसंच काही शिरुरच्या बाजारपेठेचंही झालं.
मात्र, चक्क बाजारपेठेचे स्थलांतर नविन जिजामाता चौक ते संभाजी चौक या मुख्यरस्त्यावर दुतर्फा प्रस्थापित झाले. त्यामुळे पिढ्यान पिढ्या बाजार तळावर उपजिवीका भागवणार्या छोट्या व्यवसायीक, व्यापार्यांवर उपासमारीची वेळ आली. शहराच्या वैभवासह अस्तित्व टिकवणारी मुख्य बाजारपेठेची दिवसें दिवस दूरावस्था थांबवण्यासाठी नगरपंचयात प्रशासनाला 27 वर्षात मुहूर्त सापडला नाही. याचा विपरीत रिणाम तालुक्याचं शहर असूनही नगपंचायत कार्यक्षेत्रात पोलिस ठाणे, नगरपंचातय कार्यालय, बसस्थानक वगळत इतर एकही शासकिय कार्यालय स्थिारवलं नाही.
जिजामाता चौक ते संभाजी चौक या मुख्य रस्त्यावर खासगी हॉस्पीटलसह केवळ एक स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा उरली आहे. निमुळता रस्ता, पार्कींचा अभाव आणि वाढत्या रहदारीमुळे एसबीआय शाखाही स्थलांतराच्या मार्गात आहे. बाजारपेठेसाठी नावाजलेल्या शिरुर कासार शहराची बाजारपेठ स्थिरावण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी(सीओ) गणेश दहिफळे यांनी संंभाजी चौक ते कालिंका देवी माध्यमिक विद्यालयापर्यंतच्या अतिक्रमण धारकांरना पूर्व कल्पना म्हणून नोटीसी बजावल्या मात्र अतिक्रमणधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिस संरक्षणात शुक्रवार दि.16 रोजी अतिक्रमणावर बुलडोझर चालवले.
प्रत्यक्षात काही प्रमाणात त्यांच्यावर टिका टीप्पण्या होत असल्या तरी शिरुर शहराच्या भल्यासाठी झालेल्या कारवाईचे सामान्यांतून मात्र स्वागत होत आहे. शहरातील वाहतूकीसह, बाजारपेठेस अडथळा ठरणोर्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवणार असल्याचेही मुख्याधिकारी यावेळी म्हणाले.

टप्प्या-टप्प्याने सरसकट कारवाई: शिरुर शहराच्या बाजारपेठेसह वाहतूकीस अडथळा ठरणार्या सरसकट अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहेत. कारवाईपूर्वी त्यांना सूचना देण्यात येतील शहरविकासाच्या उद्देशाने शिरुकरांच्या भल्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आजच्या मोहिमे बद्दल काहींच्या भावनांचा उद्रेक झाला असला तरी शिरुरतालुक्याच्या विकासात्मक धोरणाआड माझा आप्तइष्ट जरी आडवा आला असता तरीही मी कर्तव्यालाच प्राधान्य दिले असते तसेच आजच्या कारवाईतून केले आहे.



Comments