भाजप अध्यक्षाचे नाव मंजूर? ‘या’ नावाला आरएसएस ने दर्शवली सहमती...
- Navnath Yewale
- Jul 8
- 2 min read

भाजपच्या नवीन अध्यक्षाची निवड निवड लोकसभा निवडणुकीनंतरच होणार होती, पण ती वारंवार पुढे ढकलली जात होती. आता बरीच चर्चा झाल्यानंतर एका नावावर एकमत झाले आहे. भाजपसह आरएसएसनेही नवीन अध्यक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे. माहितीनुसार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर हे पक्षाचे पुढील अध्यक्ष असतील.
भाजप पक्षाच्या परंपरेनुसार, अध्यक्ष झाल्यानंतर ते मंत्रीपद सोडू शकतात असे मानले जाते. भाजपमध्ये एका व्यक्तीला एक पद देण्याची परंपरा पाळली जात आहे. जेपी नड्डा अध्यक्ष झाल्यावर त्यांनी केंद्रीय मंत्रीपद सोडले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्री करण्यात आले, परंतु नंतर काही माहिन्यांत नवीन अध्यक्ष निवडले जातील, अशी अपेक्षा होती.
माहितीनुसार मोनहर लाला खट्टर यांच्या नावावर एकमत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा संघटनेत काम करण्याचा दशकांचा अनुभव आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी संघटन पातळीवर प्रथम आरएसएससाठी आणि नंतर पक्षासाठी अने दशके काम केले होते. खट्टर यांनी अनेक वेळा देशभर प्रवास केला आहे आणि संघाशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांच्या नावावर एकमत झाले होते. भाजपशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, खट्टर यांच्या नावाची चर्चा संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशीही झाली होती.
मनोहर लाला खट्टर हे पक्षात एक मेहनती आणि शिस्तबद्ध संघटक मानले जातात. संघाने विशेषत: अशी विनंती केली होती की, पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीत जातीय समीकरणांपेक्षा संघटनात्मक क्षमता आणि निवडणुक रणनीती बनविण्याच्या कौशल्याकडे लक्ष दिले पाहिजे. दरम्यान खट्टर यांचे संघाशी असलेले दिर्घकाळाचे संबंध हे त्यांच्या फायद्याचे ठरले. संघासाठी बराच काळ काम केल्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. तयंना संघाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत भाजपसाठी संघटनात्मक पातळीवर काम करण्याचा अनुभव देखील आहे. खट्टर सहा कमी प्रोफाइलमध्ये राहतात, परंतु हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रशासकीय क्षमतेने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह सारख्या दिग्गजांनाही प्रभावित केले आहे. संघटनेतील त्यांच्या प्रशासकीय क्षमतेमुळे अध्यक्षपदासाठी त्यांचा दावा मजबूत झाला आहे.
महत्वाचे म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर मंत्रीपद सोडतील तर त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल. प्रादेशिक समीकरणे संतुलित करण्यासाठी हरियाणातीलच खासदाराला मंत्रीपद दिले जाऊ शकते. पंतप्रधान मोदींची कार्यशैली अशी आहे की, ते नवीन नावांसह अश्चर्यचकित करत राहतात. म्हणूनच, शहरी विकास मंत्रालय एखाद्या तरुण आणि गतिमान चेहर्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.



Comments