भाजप आमदार परिणय फुके, जरांगे पाटलांत जुंपली!
- Navnath Yewale
- Aug 12
- 1 min read
Updated: Aug 13
दोघांकडूनही परस्परांना उपमा; वादाला तोंड फुटण्याची शक्यता

जसं पावसाळ्यात बेडूक बाहेर पडतात, तसं निवडणुका आल्या की जरांगे पाटील निघतात. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं का? हे आगोदर जरांगेंनी ठरवावं अशी टीका नाागपूरचे आमदार परिनय फुके यांनी मराठा आंदोलक यांच्यावर केली होती. आमदार परिणय फुके यांच्या टीकेला जरांगे पाटलांनी त्याच तोडीत उत्तर देत परिनय फुके हा बेडूक फडणवीस यांनी शेपटी धरली ओडतो असा पलटवार केला.
नागपूर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर जहरी टीका करत जसं पावसाळ्यामध्ये बेंडक बाहेर येतात तसं निवडणुका लागल्या की जरांगे पाटील बाहेर येतात. मला नाही वाटत जरांगे पाटलांना मराठ्यांना न्याय द्यायचं काम करायचं आहे. त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यात भांडणं लावयचे आहेत आणि तेढ निर्माण करायचं काम करायचं आहे. कुठेतरी यामध्यमातून स्वत: ची पब्लिशीटी करायचं काम आहे. ज्या प्रमाणे मागील वर्षभरात ते वागले दोन्ही निवडणूकीच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आधी. त्यामुळे त्यांना मराठा समाजाचा पाठींबा त्यांना खूप कमी प्रमाणात आहे म्हणून ते या प्रमाणे स्टेटमेंड करतात असं आमदार परिणय फुके म्हणाले.
आमदार परिणय फुके यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, परिणय फुके हा पावसाळ्यातील बेडुक आहे, फडणवीस शेपुट धरील तसेच बोलणार, कुत्र्याच्या शेपूट वाकडं असतं, ते फडणवीसांनी शेपूट धरले असेल वरून, म्हणून लागलं भुंकायला. काशाला काय किंत द्यायची, स्वत:च्या लायकीने बोलायला पाहिजे”
फडणवीस यांना दम निघत नाही, त्याचा मराठा द्वेष उफाळून येतो. मराठा - ओबीसीमध्ये वाद करून, दंगली लावायच्या हे त्याच्या हिताचे नाही. मराठ्यांना फडणवीसाने हलक्यात घेऊ नये. मराठ्यांच्या नादी लागल्यास, देशातलं सरकार देखील अडचणीत येणार, माझ्या तर आजिबात नादी लागू नका, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.
Comments