top of page

भाजप आमदार सुरेश धस आक्रमक, साभागृहात जयंत पाटील-धस यांच्यात खडाजंगी


नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवसी भाजपचे आमदार आक्रम झाले. विधेयकावर बोलताना आमदार धस यांनी जयंत पाटील यांनी नाव न घेता केलेल्या आरोपावर संतप्त सवाल करत महाविकास आघाडी सरकारच्या आपल्याला कसा त्रास दिला याचा लेखाजोखाच सभागृहात मांडला.


कर्जत जामेखेड मतदार संघाच्या नामोल्लेखावरून रोहित पवार यांनी धस यांचे वक्तव्य पटलावरून काढण्याची विनंती करताच आमदार धस यांनी माझा उद्देश तसा नव्हता म्हणत फिरकी घेतली.


महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले अधिवेशन गाजावणारे भाजपचे आमदार सुरेश धस या अधिवेशनात तीन दिवसांपासून शांत होते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केलेल्या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुरेश धस यांचे नाव न घेता चौकशीची मागणी केली.


जयंत पाटील यांच्या मागणीवर बोलताना आमदार सुरेश धस यांनी आहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघातील जामखेड शहरात एका ठिकाणी डूकराचे मटण मिळते त्या ठिकाणी कोणाचे भांडणं झाली, याची चौकशी करण्यात यावी, त्या वादाचा आणि माझा काही संबंध नाही. रात्रीच्या वेळी झालेल्या तिथील वादातून हे प्रकरण घडलं आहे. कुठल्याही प्रकरणाशी आपला संबंध जोडायचा आणि बदनामी करायची. सोशल मीडियाच्या फेसबुकवर कोणालाही बोलायला लावायचे आणि बदनामी करायची.उठसूट काही आरोप करायचे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींची बदनामी करायची असा संताप व्यक्त केला.



बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात सुरेश धस यांनी आक्रमक होत संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडत महायुती सरकाचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांनी लावून धरल्याने मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली होती.


आज धस पुन्हा आक्रमक झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसन आपल्याला कसा त्रास दिला, ओढून ताणून आपल्याला गोवण्यात आले, पोलिसांचा ससेमिरा लावल्याचा थेट आरोप केला. यावरून त्यांची जयंत पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.


विधानसभेत हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने रद्द करावी, सुधारणा विधेयकावरच्या चर्चेवरून धस आणि जयंत पाटील यांच्यात जुंपली होती. सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते भाजपात सहभागी झाले. निवडून आल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हापासून आपला त्रास वाढला. काही नेत्यांनी आपल्या बदनामीची मोहिम उघडली होती. संबंध नसताना अनेक प्रकरणात गोवण्यात आले. रात्री बे रात्री पोलिसाना घरी पाठवले जायचे. चौकशी केली जायची असे आरोप धस यांनी केले.


अधिकार आणि संबंध नसताना गुन्हे दाखल करण्यात आले. सोशल मीडियावरून बदनामी केली, असाही आरोप त्यांनी केला.

अधिकार आणि संबंध नसताना गुन्हे दाखल करण्यसात आले. सोशल मीडियावरून बदनामी केली, असाही आरोप त्यांनी केला. त्यांचा सर्व रोख धनंजय मुंडे यांच्याकडे होता. त्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले. महायुतीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडे मंत्री झाले. या दरम्यान मस्साजोगमध्ये सरपंच देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पिक विमा योजनेतील घोटाळे बाहेर काढून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.


आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या कामकाजात भाग घेता आला नव्हता. देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजल्याने धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली. त्यानंतर सुरेश धस शांत झाले होते. आज त्यांचा राग पुन्हा उफाळून आला. त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसने कसा कसा त्रास दिला याची उजळणीच विधेयकावर चर्चेच्या माध्यमातून केली.


आमदार रोहित पवारांचा आक्षेप:

आमदार धस यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा च्या विधानावर अक्षेप घेत आमदार रोहित पवार यांनी जामखेड ही आहिल्यादेवी होळकर, संत महंताची भूमी आहे. आमदार धस यांनी माझ्या मतदार संघाचा उल्लेख करत डुकराच्या मटणाचा उल्लेख केला तो रेकॉर्डवरून काढण्याची अध्यक्षांना विनंती केली.

Comments


bottom of page