top of page

भारताचा पाकिस्तान विरोधात आणखी एक कठोर निर्णय? पाकिस्तानला दहशतवादी कृत्याची किंमत मोजावीच लगाणार !


ree

जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आहे. बैसरन खोर्‍यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेणार्‍या या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरा दिला आहे. भारतच्या एकापाठोपाठ एका निर्णयाने पाकिस्तान पुरता भेदरलेला असतानाच भारत पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत लवकरच पासिक्तानसोबतची टपाल सेवा पूर्णपणे बंद शकतो.


भारत आणि पाकिस्तानमधील टपाल सेवेचा इतिहास तसाच चढ- उतराचा आहे. जसे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध2019 मध्ये, पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता, तेव्हा भारताने पाकिस्तानसोबतची टपाल सेवा बंद केली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरमधूनक कलम 370 हटवल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बर्फासारखे थंड झाले होते. पण हे पहिल्यांदाच नव्हते 1971 च्या युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तासोबतच्या टपाल सेवांवर बंदी घातली होती, जेव्हा भारताने केवळ युद्ध जिंकले नाही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला मुक्त केले.


पाकिस्तानसाठी, टपाल सेवा बंद करणे ही केवळ कागदोपत्री बाब ठरणार नाही. हे असं कठोर पाऊल आहे जे आधीच डळमळीत असलेल्या अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकतं. टपाल सेवा केवळ वैयक्तिक पत्रे आणि पार्सलच देत नाही तर छोटे व्यवसाय, कागदपत्रांसाठी देवाणघेवाण आणि काही सरकारी संप्रेषण देखील करत असते. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात आहे. 2023 मध्ये महागाई 38.50% पर्यंत पोहोचली होती आणि परकिय चलनसाठा आठवडाभराच्या आयातीसाठीही पुरेसा नव्हता.


टपाल सेवा बंद केल्याने पाकिस्तानमधील लहान व्यापार्‍यांना आणि ई- कॉमर्स क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांवर मोठा घाला असू शकतो. याशिवाय हे एक मोठ राजनैतिक पाऊल देखील असेल. हे पाऊल भारताची अशी कठोर भूमिका प्रतिबिंमित करेल,जी पहलगाम हल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक आघाडीवर दबाव टाकण्याच्या रणनीतीवर काम करत आहे.


पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा प्रतिसाद जलद आणि कडक होता. पाकिस्तानने शिमला करारातून माघार घेतल्यानंतर, आता भारतासाठी पीओकेमध्ये लष्करी कारवाईचे दरवाजे उघडले गेले आहेत. पण भारत सध्या राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवर दबाव निर्माण करून पाकिस्तानला गुडघे टेकवण्याच्या रणनितीवर काम करत आहे.

Comments


bottom of page