top of page

भारतात, पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंट ब्लॉक !

आयटी मंत्रालयाच्या आदेशावरून कारवाई


ree


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आता एलोन मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मला भारतातील पाकिस्तानी सरकारचे एक्स अकाउंट बंद करण्यास सांगितले आहे. भारत सरकारच्या या विनंतीवरुन एक्स ने कारवाई केली आहे आणि ते खाते बंद केले आहे. याचा सरळ अर्थ असा की, पाकिस्तानी सरकारचे एक्स अकाउंट आता भारतात दिसणार नाही. एक्स प्लॅटफॉर्म हे एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे, जिथे जगभरातील नेते आणि सरकारे सत्यापित खाती ठेवतात. या खात्यांद्वारे ती तिच्या देशाबद्दल निर्णय आणि इतर माहिती देते. हे खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.


कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्वाची बैठक

मंगळवारी जम्मू आणि काश्मिीरमधील पहगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर, बुधवारी संध्याकाळी भारतात कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी (सीसीएस) ची एक महत्वाची बैठक झाली. यामध्ये


पाकिस्तानविरुद्ध पाच कठोर निर्णय घेण्यात आले.

1) भारत आणि पाकिस्तानमधील औटारी सीमा तपासणी नाका बंदे करणे,

2) पाकिस्तानमधील भारतीय दूतावास आता बंद करावा.

3) कठोर पाऊल उचलत, भारताने सिंधू पाणी करारही थांबवला आहे.

4) भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी राजदूतांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5) आता पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळणार नाही.

आता गुरुवारी, भारतातील एक्स प्लॅटफॉर्मवर पाकिस्तान सरकरचे खाते ब्लॉक करण्यात आले. एक्स प्लॅटफॉर्म हे एक लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे, जिथे जगभरातील नेते आणि जवळजवळ सर्व देशांच्या प्रतिनिधींची खाती आहेत.

Comments


bottom of page