top of page

राज्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ?, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ!

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. पण देशातील महानगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंतीत वाढ झाली आहे. ही दरवाढ केवळ किरकोळ असली तरी त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार वर्षापासून देशातील इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. पण अखाती देशातील युद्धाचा मोठा फटका कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंती या महिन्यात 60 रुपयांनी वाढल्या. तर त्या पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे. आज पुणे, सोलापूरसह अनेक शहरात पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले.


सोलापूरात सध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनची वाढ दिसून आली. सोलापूरातील पेट्रोल पंपावर साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. साधे पेट्रोल 104 रुपये तर स्पीड पेट्रोल 111 वरून 113 रुपये झाले. साधं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्याच आहेत मात्र स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी वाढले. पुण्यातही अशी दरवाढ झाली आहे. आमच्याकडे पेट्रोलचा साठा स्थिर आहे कोणताही तुटवडा नाही मात्र काही ग्राहक गर्दी करत असल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे.


दरम्यान, आखाती देशात कच्चे तेल गुरूवारी 119 डॉलर प्रति बॅलरपेक्षा जवळपास 14 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त झाले. तर दुसरीकडे अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयचा भाव गुरुवारी 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा 8 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला. युद्ध सुरू असताना घसरल्याने कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे एक वक्तव्य आले आहे. त्यानुसार, इराण आता कमकुवत झाला आहे. त्याच्याकडे युद्ध लढण्यासाठी रसद नाही. त्यामुळे हे युद्ध लवकरच संपणार असा दावा त्यांनी केला होता. तेव्हापासून किंमतीवर परिणाम दिसून येत आहे.


आयओसीएल च्या आकडेवारीनुसार, चार महानगरांपैकी तीन महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रमश: 94.77 रुपये आणि 87 .67 रुपये प्रति लिटर आहेत. तर कोलकत्तामध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक 105.41 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलची किंमत 92.02 रुपये प्रती लिटर इतकी आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझलची किंमत क्रमश: 103.54 रुपये आणि 90.03 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल 101.6 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 92.61 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

Comments


bottom of page