top of page

इस्त्रायली हल्ल्यात इराणच्या दुसर्‍या शक्तीशाली नेत्याचा मृत्यू इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 19 व्वा दिवस आहे. मंगळवारी (दि.17) म्हणजेच 18 व्या दिवशी झालेल्या इस्त्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने याला दुजोरा दिला आहे.


आयआरजीसी ने इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमधील 100 हून अधिक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले लारीजानी, त्यांचा मुलगा आणि बसिज निलष्करी दलाचे कमांडर गुलामरेझा सोलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. इराणने असाही दावा केला आहे की, इस्त्रायलची मजबूत संरक्षण यंत्रणासुद्धा हे हल्ले रोखू शकली नाही. इस्त्रायलच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्ताच्या अवशेषांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


अली लारीजानी हे इराणचे एक अत्यंत प्रभावशाली नेते तत्वज्ञानी आणि राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख होते.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या युद्धाच्या पहिल्याच केलेल्या इस्तायली आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यातील मृत्यूनंतर ते देर्शात शक्तीशाली व्यक्तीपैकी एक म्हणून उदयास आले होते. इराणच्या राजकीय, लष्करी आणि सुरक्षा यंत्रणांमधील एक महत्वाचा दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या धोणात्मक निर्णय प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अली लारीजानी यांचा जन्म 3 जून 1958 रोजी इराकमधील नजफ येथे इराणच्या अमोल शहरातील एका श्रीमंत कुटुंबात झाला त्यांचे कुटुंब इतके प्रभावशाली होते. की 2009 मध्ये ‘टाईम’ मासिकाने त्यांना “ इराणचे केनेडी” असे संबोधले होते. वडिल एक प्रमुख धार्मिक़ अभ्यासक होते आणि त्यांच्या भावांनीही इराणच्या न्यायपालिकेत आणि इतर महत्वाच्या समित्यांवरप उच्च पदे भूषवली आहेत.


लाजीरानी हे साधारपणे शांत आणि ‘व्यवहारिक ’ नेते मानले जात होते. जे पाश्चात्य देशांशी वाटाघाटी करण्यास तयार असत. मात्र, 28 फेब्रूवारी 2026 रोजी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची इस्त्रायलच्या हल्ल्यात हत्या झाल्यानंतर लारीजानी यांची भूमिका अत्यंत आक्रमक झाली. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचा कारभार पाहणार्‍या तीन सदस्यीय संक्रमणकालीन परिषदेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि देशाच्या सुरक्षेची सूत्रे हाती घेतली. त्यांनी अमेरिका आणि इस्तायलला गंभीर परिणामांची आणि अमेरिकन सैनिकांना ठार मारण्याची धमकी दिली होती.


वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकचे संस्थापक रुहुल्लाह खामेनी यांचे जवळचे सहकारी मुर्तझा मुताहारी यांच्या मुलीशी (फरीदेह मुताहारी) यांच्याशी विवाह केला. बहुतांश इराणी नेत्याप्रमाणे केवळ धार्मिक शिक्षण न घेता त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी धर्मनिरपेक्ष होती. 1979 मध्ये त्यांनी शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून गणित आणि संगणक विज्ञानात पदवी मिळवली आणि नंतर तेहरान विद्यापीठातून पाश्चात्य तत्वज्ञानात पदव्युुत्तर आणि डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय 18 व्या शतकातील जर्मन तत्वज्ञ ‘ इमॅन्युएल कांट’ हा होता.


दरम्यान 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर,1980 च्या दशकाच्या सुरुवातील ते इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स (आयआरजीसी) मध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष रफसंजानी यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक मंत्री (1994-1997) आणि सरकारी प्रसारण संस्था आयआरआयबी चे प्रमुख (1994-2004) म्हणून काम केले. 2008 ते 2020 या काळात त्यांनी सल तीन वेळा इराणच्या संसदेचे (मजलिस) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि देशांतर्गत तसेच परराष्ट्र धोरणाल आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली.


लारीजानी यांनी 2005 मध्ये अध्यपदाची निवडणूक लढवली होती. परंतु ते त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर त्यांची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव आणि इराणचे प्रमुख अण्विक वाटाघातीकार (2005-2007) म्हणून नियुक्ती झाली होती. 2015 मध्ये इराण आणि जागतिक महासत्तांमध्ये झालेल्या अणुकराराला (जेसीपीओए) संसदेची मंजुरी मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमीका बजावली.


लारीजांनी यांनी 2021 आणि 2024 च्या अध्यक्षीय निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु इराणच्या ‘ गार्डियन कौन्सिल’ ने त्यांना उमेदवारीसाठी अपात्र ठरवले होते. तरीही, ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी त्यांची पुन्हा सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवपदी नियुक्ती केली होती.

Comments


bottom of page