top of page

भिषण अपघात; कुंडेश्वर दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारं वाहन दरीत कोसळलं

दहा महिला भाविकांचा मृत्यू; 27 भाविक जखमी


ree

पुण्यातील खेड तालुक्यात श्रावण सोमवार निमित्त पापळवाडी येथील 35 ते 41 भाविकांना श्री क्षेत्र कुंडेश्वर दर्शनासाठी घेऊन जाणारा पिकअप 30 फूट खोल दरीत कोसळल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.या अपघातात 10 महिलां भाविकांचा मृत्यू झाला असून 27 भाविक जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात एवढा भिषण होता की, अपघातग्रस्त वाहनाने अनेक पलट्या घेतल्या. श्रावण सोमवार निमित्त देवदर्शनासाठी जाणार्‍या 10 महिला भाविकांना या अपघातात जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहिर केली आहे.


पापळवाडी येथील जवळपास 41 भाविक ज्यामध्ये महिला भाविकांची सख्या अधिक असलेले पिकअप सोमवारी (11 ऑगस्ट) दुपारी 1:00 च्या सुमारास खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महादेव कुंडेश्वर दर्शनासाठी जात होते. दरम्यान, कुंडेश्वर मंदीर एका टेकडीवर वसलेले असून सोमवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यातच श्रावणाचा तिसरा सोमवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती.


पापळवाडी येथील भाविकांना घेऊन जात असलेल्या पिकअप चालकाचा पैठ गावाजवळील चढ आणि अरुंदरस्त्यामुळे ताबा सुटला. दरम्यान चालक ऋषिकेश करांडे यांचा वाहनावर ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

प्राथमिक तपासानुसार जास्त भारामुळे पिकअप चढ चढू शकला नाही, त्यामुळे तो मागे सरकला आणि 30 फूट खोल दरीत पलटला. या अपघातमध्ये अपघातग्रस्त पिकअप दरीत कोसळताना अनेक वेळा उलटला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 महिला भाविकांचा जागीच मृत्य झाला तर 27 जण जखमी झाले, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.


पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या माहितीनुसार अपघातग्रस्त पिकअपमध्ये 35 ते 41 प्रवासी भाविक होते, जे क्षमतेपेक्षा जास्त होते. प्राथमिक तपासानुसार , विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनाला रस्ता देण्यासाठी चालक ऋषिकेश कारंडेने पिकअप चढावर थांबवला. परंतु उतारावर पिकअप पुन्हा सुरू होऊ शकला नाही, तो मागे सरकला आणि दरीत कोसळला. चालक जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पुणे ग्रामीण पोलिस आणि पिंपरी चिंचवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना राजगुरूनगर येथील शिवतीर्थ रुग्णालय, गावडे रुग्णालय यासह इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवतीर्थ रुग्णालयाचे डॉ. प्रफुल्ल बोरुडे म्हणाले की, “ आमच्याकडे एका मुलासह पाच जखमी आहेत तिघांची प्रकृती गंभीर आहे. गावडे गावडे रुग्णालयाचे डॉ.हर्षद गावडे म्हणाले “ तीन महिलांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका महिलेचा आधिच मृत्यू झाला होता.

Comments


bottom of page