top of page

भेसळमाफियांचे हात प्रयोगशाळेपर्यंत? दुध, औषध भेसळखोरांवर मकोका लावा

आमदार सुरेश धस अधिवेशनात गरजले; एफडीएला मणुष्यबळ तपासणी यंत्रणेची मागणी

बीड: आपल्या धाकट, रांगड्या शैलीत, पुराव्यासह अभ्यासपूर्ण मांडणीतून लक्ष वेधून घेणारे आमदार म्हणून सुरेश धस यांची उभ्या महाराष्ट्रात ख्याती आहे. सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळमुक्ती सुरू असलेल्या धडाकेबाज कारवायांचा ‘ छापेमारी पॅटर्न’ चर्चेत आहे. प्रतिबंधित गुटखा, दुध, खाद्य पदार्थांच्या भेसळमाफियांविरोधात आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कायद्याचा फास आवळला आहे. तुकाराम मुंडे यांच्या कारवायांने नागरिकांच्या आरोग्यासी खेळणार्‍या भेसळमाफियां विरोधात संताप व्यक्त होत असताना आमदार सुरेश धस यांनी शनिवारी (दि.4) अधिवेशनात सभागृृहामध्ये भेसळमाफियांची कुंडलीच काढली, त्याचबरोर एफडीए विभागातील तुटपुंजू मणुष्यबळ, तपसणीयंत्रणेचा अभाव यावरही त्यांनी मुद्देसूद मांडणी करत पर्यायी उपाय योजनांची मागणी केली.


नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या भेसळमाफियांविरोधात एफडीए चे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला प्रकरणी दोषींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाईची तरतूद करण्यात आल्या आहे. त्यामुळे राज्यभरातील गुटखामाफियांच्या झोपा उडाल्या आहेत.प्रतिबंधित गुटख्या प्रमाणेच दुध, खाद्य पदार्थ भेसळमाफियांवरही मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करत भाजप आमदार सुरेश धस यांनी सभागृहात लक्षवेधी सादर केली. आमदर धस यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनास मंत्री नरहरी झिरवळ यांनी सकरात्मक प्रतिसाद देत मागण्यांची तात्काळ दखल घेतली जाईल असे अश्वासन सभागृहात दिले.


आमदार धस म्हणाले की, कारवई दरम्यान दुध, खवा, पनिरचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात, ते तपासणीसाठी ठरावीक लॅबमध्येच पाठवले जातात. याचाच गैरफायदा घेवून भेसळमाफियां थेट लॅब पर्यंत पाहोचतात आणि चक्क नमुने बदलून रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार असेल तर तो निगेटिव्ह येतो. प्रत्यक्षात तपासणी लॅबमध्येच नमुने बदलले जातात, हे लोक खूप बरबटलेले असल्याचा अरोपही त्यांनी केला. गुटख्याच्या बाबतीत मोका तर दुधाच्या, औषधींच्या बाबतीही मोका सुद्धा मोका लावण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय भेसळीबाबत राज्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज असल्याचंही आमदार सुरेश धस म्हणाले.


राज्याच्या एफडीए विभागावरील केंद्र शासनाच्या नियंत्रणासाठी गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यासाठी केवळ एक अधिकार्‍याची नियुक्तीकडेही आमदार धस यांनी लक्ष वेधले. “ एक अधिकारी दोन राज्यात काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र शासनानेही मणुष्यबळ वाढवले पाहिजे त्यासाठी शिफारस करण्याची मागणी त्यांनी केली. राज्याच्या एफडिए विभागाकडे मणुष्यबळच नाही, दुधभेसळी बाबत छोट्या दुध संकलन केंद्राप्रमाणे 50 लिटर पेक्षा जास्त दुध संकल करणार्‍या मोठ्या डेअर्‍यामध्ये जाऊन बघा, तपासणी सुद्धा करता येत नाही. “ मोठाल्या डेअर्‍यावाले सगळे संत तुकाराम आहेत काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोठ्या डेअर्‍यांच्या तपासणीकडे लक्ष वेधले. प्रत्यक्षात ‘बलकुलर’च्या नावाखाली कसलही दुध घेवून जातात आणि कंपाऊंडच्या आत गेलं की पवित्र होतं असा अरोपही धस यांनी केला.

एफडीए च्या मणुष्यबळाबाबत आमदार धस यांनी राज्यातील आहिल्यानगर जिल्ह्याचे उदाहरण देत, आहिल्यानगर जिल्ह्यास दोन खासदार आहेत, डीलिमिटेशन झाले तर तीसरा खासदारही होऊ शकतो एवढा मोठा जिल्हा आहे त्याव जिल्ह्यासाठी एफडीएकडे केवळ एकच अधिकारी आहे. भेसळमुक्त महाराष्ट्र आणि नागरिकांच्या अबाधित आरोग्यासाठी एफडीएकडे पुरेसे मणुष्यबळ आणि तपासणीसाठी दुग्धविकासाच्या लॅब वर्ग करणे अवश्यक असल्याच्या सूचनाही आमदार सुरेश धस यांनी आपल्या लक्षवेधीतून मांडल्या.


आमदार सुरेश धस यांच्या लक्ष वेधीला मंत्री नरहरी झिरवाळ उत्तर देताना म्हणाले की, गुटखा प्रकरणी मकोका लावला त्याचे नोटिफिकेशन जारी केले आहे कायद्यात रुपांतराची कार्यवाही सुरू आहे, दुध भेसळीबाबतही मकोका कसा लावता येईल त्या पद्धतीत अभ्यास करून प्रस्ताव एलएनजीए ला पाठवण्यात येईल. महाराष्ट्र दुध भेसळ कायद्याचा ड्राप पूर्वीच तयार केला होता, आता आयुक्त तुकाराम मुंडे यांनी त्याच्यातीत गंभीरता कशी येईल त्यातील बारकावे तपासून पुन्हा ड्राप तयार केला आहे. तो याच हप्त्यात एलएनजीए पाठवून त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल. तपासणी यंत्रा बाबत दुग्ध विकास विभागाकडेच मशनरी धुळखात पडून असल्याची माहिती आहे. त्यासाठी मणुष्यबळ असेल यंत्रणा असेल ती उपलब्ध करण्यासाठी अवश्यक कार्यवाही करण्यात येईल.


प्रत्यक्षात एफडीए विभागात सद्यस्थितीत 1100 औषध निरिक्षकांची गरज असताना एकून मंजूर पदे केवळ 200 आहेत. अवश्यकतेनुसार आकृतीबंद त्रुटीमुळे परत आला, तो नव्याने सादर केला जाईल. विभागात पूर्णक्षमतेने मणुष्यबळ कार्यान्वित करण्योच अश्वासन देत मंत्री झिरवळ यांनी आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाची स्तुती केली.


मतदार संघातील भेसळयुक्त खवा प्रकरणात आमदार धस लक्ष घालणार काय? : आमदार सुरेश धस यांनी मांडलेल्या लक्षवेधीने राज्यभरातील भेसळमाफियांची झोप उडाली आहे. सभागृहात अभ्यासपूर्ण आपल्या रांगड्या शैलीत अत्यंत सूचक लक्षवेधीने अन्न व औषध सुरक्षा विभाग मंत्रालयास मागण्यांची दखल घेण्यास भागपाडले. पण गेल्या बुधवारी (दि.3) आष्टी, पाटोदा, शिरुर मतदारसंघातील शिरुर कासार तालुक्यातील दहिवंडी शिवारात पोलिस आणि एफडीए नेक केलेल्या छापेमारीमध्ये दुधाशिवाय तयार होणार्‍या भेसळयुक्त खवा कारखान्याचा भांडाफोड केला. आमदार साहेब.. छापेमारी करणार्‍या पोलिस, एफडीएच्या कर्मचारी, काही माध्यमप्रतिनिधीचा उग्र दुर्गंधी सामना करावा लागला. दुसर्‍या दिवशी अक्षरश: त्यांना उपचार घ्यावे लागले.


या कारखान्यातून बीडसह लातूर, छत्रपतीसंभाजीगर, आहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत भेसळयुक्त खवा सप्लाय करण्यात येत होता असी दबक्या आवाजात चर्चा आहे. शिवाय शिरुर शहरातील संशयित मिठाई दुकानात याच खव्यापासून खाद्य पदार्थ तयार करण्यात येत होते. एवढे सत्य असताना बीडच्या एफडीए विभागाने छापेमारीनंतर चक्क तिसर्‍या दिवशी या संशयित मिठाई दुकानांचे नमुने घेण्याचा सोपस्कार केला. यामध्ये एफडीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी हात ओले केल्याची दुर्गंधी येत आहे.


... आण्णा या लोकांनी मिठाईच्या नावाखाली ‘सॅफोलाईट’ या घातक टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये वापरात येणारं रसायण जे मानवी आरोग्यास खूपच घातक आहे. ते नागरिकांना खाऊ घातलं आहे. या प्रकरणातील दोषींना धडा शिकवण्यासाठी तुम्ही पुढकार घेतला पाहिजे अशी मतदारसंघातील नागरिकांची माफक अपेक्षा लोक बोलून दाखवत आहेत.


विशेष म्हणजे छापेमारीमध्ये सक्रिय असलेल्या माध्यमप्रतिनिधींसह दहिवंडीचे सरपंच, पोलिस साक्षीदार आहेत. एफडीए च्या कर्मचार्‍यांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी अटक संशयित आरोपी सांगितले तेवढीच मोजदादीची नोंद केली आहे. त्यामुळे एफडीए च्या या कारवाईत चक्क तोडपाण्याची दुर्गंधी आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.


नागरिकांचा संताप पेल्यात: छापेमारी नंतर दुसर्‍या दिवशी एका पक्षाचे पदाधिकारी संशयित मिठाई दुकानासमोर आपला संताप व्यक्त करत हल्ला करण्याच्या केला. शिवाय मिठाई दुकानं बंद ठेवा अन्यथा तोडफोड करण्यात येईल असा इशराही पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, या नागरिकांचा संताप अक्षरश: पेल्यातले वादळं ठरल्याचे चित्र आहे त्यामुळे आण्णा तुम्ही सभागृहात मांडलेली लक्षवेधी स्थानिक पातळीवर तंतोतंत खरी ठरत आहे.

Comments


bottom of page